हो, 'सिरम इन्स्टिट्यूट'कडून मी लस घेतली; पण ती कोरोनावरची नव्हे तर...; शरद पवारांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 05:33 PM2020-10-02T17:33:56+5:302020-10-02T17:51:47+5:30

मी कोरोनावरची लस घेतली आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये खासगीत सुरु आहे..

'That' vaccine taken from Siram is not from Corona but ...: Sharad Pawar's revelation | हो, 'सिरम इन्स्टिट्यूट'कडून मी लस घेतली; पण ती कोरोनावरची नव्हे तर...; शरद पवारांचा खुलासा

हो, 'सिरम इन्स्टिट्यूट'कडून मी लस घेतली; पण ती कोरोनावरची नव्हे तर...; शरद पवारांचा खुलासा

Next
ठळक मुद्देपुण्यात शरद पवार यांनी शुक्रवारी सिरम इन्स्टिट्यूट ला दिली भेट

पुणे : शरद पवार व सिरम इन्स्टिट्यूट चे प्रमुख हे वर्ग मित्र आहे. व त्यामुळेच पवारांनी कोरोनावरची लस घेतली आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये खासगीत सुरु आहे.  हो, सिरम इन्स्टिट्यूटकडून मी व माझ्या सहकाऱ्यांनी लस घेतली. पण ती कोरोनावरची नसून रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आहे, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केला आहे. 

पुण्यात शरद पवार यांनी शुक्रवारी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,मी व माझ्या सहकाऱ्यांनी लस घेतली आहे. मात्र, ती कोरोनावरची नाही तर रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. कोरोनावरची लस उपलब्ध होण्यासाठी अजून ३ ते चार महिन्यांचा काळ लागण्याची शक्यता आहे. कदाचित जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात ही लस मिळेल अशी माहिती सिरमकडून देण्यात असल्याचा आवर्जून उल्लेख यावेळी शरद पवार यांनी केला.   

हाथरस प्रकरणावर शरद पवार यांनी दिली ' ही ' प्रतिक्रिया.. 
 उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे त्या तरुणीसोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असा आहे. पोलिसांकडून तिचा मृतदेह कुटुंबियांकडे न सोपवता परस्पर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील जनतेने यासारखी घटना आज प्रथमच पाहिली आहे. या सर्व प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने कायद्याला कवडीची किंमत दिली नाही हे अधोरेखित होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी व सांत्वन करण्यासाठी तिथे शांततेच्या मार्गाने चालले होते. खरंतर पीडित कुटुंबाची भेट घेऊ देण्यात पोलीस व सरकारला काहीच अडचण नव्हती. मात्र त्यांना जी काही वागणूक दिली गेली ती अशोभनीय व अतिशय चुकीची आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही दिले स्पष्टीकरण..  

शरद पवार म्हणाले, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयात गेले आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवली पाहिजे हीच महाविकास आघाडी सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून भूमिका आहे.परंतु, आमच्या व्यतिरिक्त कुणाला अजून मराठा आरक्षणासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवायचे असतील आमची काही हरकत नाही. 

 

Web Title: 'That' vaccine taken from Siram is not from Corona but ...: Sharad Pawar's revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.