लॉकडॉउनचा सदुपयोग, वाशिम जिल्ह्यातील दाम्पत्याने खोदली विहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:42 IST2021-06-17T11:41:53+5:302021-06-17T11:42:01+5:30

Utilization of lockdown : जामखेड येथील पोफळे कुटुंबियाने विहिर खोदून पाणी टंचाईल तोंड दिल्याचे दिसून येत आहे.

Utilization of lockdown, well dug by family in Washim district | लॉकडॉउनचा सदुपयोग, वाशिम जिल्ह्यातील दाम्पत्याने खोदली विहिर

लॉकडॉउनचा सदुपयोग, वाशिम जिल्ह्यातील दाम्पत्याने खोदली विहिर

वाशिम : कोरोनसंसर्गामुळे सर्वत्र हाहाकार माजला असतांना कुठे लॉकडाउन तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आलहोते. वाशिम जिल्हयात कडक निर्बंंध असताना रिकाम्या वेळेचा सदुपयोग करीत जामखेड येथील पोफळे कुटुंबियाने विहिर खोदून पाणी टंचाईल तोंड दिल्याचे दिसून येत आहे.

मालेगावा तालुक्यातील जउळका रेल्वे नजिक जामखेड येथील रामदास पोफळे कोरोनामुळे काम धंदा नसल्याने गुजरातहून गावाकडे परत आले. कोरोनामुळे कडक निर्बंघात घरी वेळ जात नाही यावेळेस काय करावे काय असा प्रश्न पडला. परंतु गावात पाणी टंचाई असल्याने घरी विहीर खोदावी का यावर पत्नी सोबत चर्चा केली. दोघांची सहमती झाल्यानंतर दोघेही विहीर खोदण्याच्या कामाला लगले.

 

कोरोनाकाळ अनेकांना धडा शिकुवून गेला तर या काळात अनेकांनी आयुष्याचे चढ उतार पहिले, त्यातून अनेक लोक खचून गेले तर अनेकांनी चांगले काम ही केले अशीच काही सकारात्मक उर्जा देणार कार्य मालेगाव तालुक्यातील जामखेड गावातील एका दाम्पत्याने करून दाखवले आहे या दाम्पत्याने कडक निर्बंघ काळात २५ दिवसात २० फुट विहीर खोदली असून त्याला पाणी लागले आहे .

  वाशीम जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील जामखेड गावातील रामदास पोफळे याचं हे कुटुंब कडक निर्बंधामध्ये गुजरातला खाजगी कंपनीत काम करीत होते. रामदास यांना कोरोना मुळे गावी परत यावे लागले मात्र ऐन उन्हाळ्यात गावी आल्याने या गावात नेहमी प्रमाणे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने पाणी टंचाईवर मात करण्याचे या दाम्पत्याने ठरवले आणि कोरोना काळाच्या रिकाम्या वेळात घरासमोरील अंगणात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना यश ही आले. त्यांच्या २० फुट विहिरीला पाणी लागले. घरी बोअरवेल न घेता विहीर फायदेशीर ठरते आणि आपल्याला असलेली पाण्याची गरजेबरोबर इतरांना पाणी मिळू शकले या भावनेतून त्यांनी विहीर खोदली . यामध्ये पत्नी आणि १० वर्षाच्या मुलाचं योगदान मिळाले असल्याच रामदास सांगतात. कोरोनाची भीती आणि वाढता उन्हाचा पारा त्या मुळे बाहेर निघणे कठीण होऊन बसले अश्यावेळेस एक दीड किलोमीटर वरून पाणी भरण्यासाठीचा त्रासमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. यावेळी शेजार्यांनी ही हसण्यावर घेत त्यांची गमंत उडविली, मात्र त्यांनी खचून न जाता आपला निर्णय कायम ठेवत विहीर खोदण्यास सुरुवात के ली व पाणी लागले. कोरोना काळात कोीरोनाशी दोन हात करत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत खोदलेल्या विहिरीची चर्चा पंचक्रोशीत आहे

Web Title: Utilization of lockdown, well dug by family in Washim district