शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

'मिडिया व्हॅल्यू' मिळविण्यासाठी 'भुजबळ' नावाचा वापर;कांदे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 6:26 PM

भुजबळ म्हणाले, पोलिसांनी संपुर्णपणे तपास करावा फोन कॉलचे रेकॉर्डिंग तपासावे यामध्ये आमचा काहीही एक संबंध नाही. 'भाई' युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, हे मी सांगू शकत नाही, असा चिमटाही भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत यावेळी काढला.

ठळक मुद्दे'कांदे, संदर्भ भुजबळांचाच देतात'सखोल चौकशी करुन कारवाई करावी

नाशिक : राजकारणात 'मिडिया व्हॅल्यू' मिळविण्यासाठी 'भुजबळ' नावाचा वापर केला गेला. कांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याच्या कुटील डाव असून त्याची तक्रार मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून चौकशीची मागणीही केली आहे. मी कधीही 'भाई' युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलो नाही, असा टोलाही यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.

पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी भुजबळ हे बुधवारी (दि.२९) दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिकमधील मालेगाव स्टॅन्ड येथील अहल्यादेवी होळकर पुलावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पोलिसांनी संपुर्णपणे तपास करावा फोन कॉलचे रेकॉर्डिंग तपासावे यामध्ये आमचा काहीही एक संबंध नाही. 'भाई' युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, हे मी सांगू शकत नाही, असा चिमटाही भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत यावेळी बोलताना काढला. ज्या अशोक निकाळजे नावचा कांदे यांनी तक्रार अर्जात उल्लेख केला आहे, त्यांनीच भुजबळ यांच्याशी आमची काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितल्याने प्रश्न मिटतो. उलट कांदे यांनीच 'मी आमदार आहे, तुला शिकवितो असा दम दिला' असा आरोपही निकाळजे यांनी केल्याचे भुजबळ म्हणाले. यामुळे आता पोलीस प्रशासनाने याबाबत सखोल चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, याबाबत मी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याशीही चर्चा केली आहे, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.'कांदे, संदर्भ भुजबळांचाच देतात'कांदे म्हणतात मी भुजबळांचे नाव घेतले नाही, आणि तक्रार अर्जात माझ्याच पदाचा नामोल्लेख करतात अन् संदर्भ माझ्याच नावाचा देतात असेही छगन भुजबळ म्हणाले. राजकारणात अशा प्रकारच्या आरोप करण्यापुर्वी गांभीर्याने विचार करायला हवा, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashik Floodनाशिक पूरgodavariगोदावरीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिस