100% शेतकरी करताहेत डेबिट कार्डचा वापर
By Admin | Updated: January 1, 2017 02:25 IST2017-01-01T02:25:58+5:302017-01-01T02:25:58+5:30
खेडी खुर्दतील १०० टक्के शेतकरी डेबिट कार्डचा वापर करू लागले आहेत. मात्र, मजुरांना रोखीने पैसे द्यावे लागत असल्याने, शेतकऱ्यांना नाईलाजाने एटीएममधून पैसे काढून

100% शेतकरी करताहेत डेबिट कार्डचा वापर
खेडी खुर्दतील १०० टक्के शेतकरी डेबिट कार्डचा वापर करू लागले आहेत. मात्र, मजुरांना रोखीने पैसे द्यावे लागत असल्याने, शेतकऱ्यांना नाईलाजाने एटीएममधून पैसे काढून ते मजुरांना द्यावे लागतात. वीजबिल, रासायनिक खते, फवारणीची औषधे आदींसाठी ई-वॉलेटचा उपयोग शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील युवक करू लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी गावात शेतकरी डेबिट कार्डचा वापर फारसा करीत नव्हते. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर, सर्वच शेतकरी डेबिट कार्ड वापरू लागले आहेत. आता खते, बियाणे खरेदीसाठी कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण सात ते आठ पट अधिक आहे.
गाव : खेडी खुर्द
ता. जिल्हा : जळगाव
जिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : ७ किलोमीटर.
लोकसंख्या : २ हजार
बॅँका, पतसंस्था : नाही.
पोस्ट आॅफिस : नाही.
एटीएम : नाही.
वाहतूक सुविधा :
एसटी बसची
एक फेरी
इंटरनेट सुविधा : आहे
वीज : भारनियमन नाही.
कॅशलेस व्यवहार : दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : २५० जणांनी एसबीआय बडी, पे व इतर ई-वॉलेट डाउनलोड केले असून, त्याचा व्यवहारांसाठी ते वापर करू लागले आहेत.
40%
स्मार्ट फोनधारक
75%
साक्षरता
50%
कॅशलेस व्यवहार
नोटाबंदीचा प्रतिकूल परिणाम रोजच्या व्यवहारांवर झाला, असे नाही. आमच्या कुटुंबातील युवक कॅशलेस व्यवहार करतात. त्यांच्या मदतीने व्यवहार होतात, पण मजूर वर्ग विशेषत: ५० ते ६० वयापुढील ग्रामस्थांना रोखीने पैसे हवे असतात.
- कैलास चौधरी, सरपंच,खेडी खुद
आमचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असल्याने डेबिट कार्ड उपलब्ध होते. फक्त त्याचा वापर कमी होता. हा वापर आता वाढला आहे. रोकड सोबत बाळगण्याची आता गरज नाही.
- संजय नारायण चौधरी
भ्रष्टाचार मुक्तीसाठी नोटा रद्दचा निर्णय चांगला आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे, पण सर्वच ग्रामस्थ किंवा मजुरांच्या कुटुंबातील एका व्यक्तीकडे डेबिट कार्ड, स्मार्ट फोन असावे. यामुळे रोकडची गरज राहणार नाही.
- सचिन
मनोहर पाटील
जळगावजवळ असल्याने आम्हाला किराणा, खते आदी कॅशलेस व्यवहाराने घेता येतो, पण भाजीवाले, मजूर यांच्यासाठी घरात रोकड असली पाहिजे.
- धनंजय दिलीप चौधरी
माझ्या कुटुंबाचे व्यवहार माझ्या स्मार्ट फोनवरून करता येतात, पण हे स्मार्ट फोन, ई-वॉलेट अगदी मजुरांपासून ते व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, खासगी क्लासचालक, अशा सर्वांकडे असायला हवेत.
- स्वप्निल भानुदास महाजन