शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भीषण! कोविड स्मशानभूमीत वेडसर माणसाने खाल्ले मानवी अवयव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 20:25 IST

दरम्यानच्या काळात तो मानवी देहाचे अवयव खात असल्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर पसरताच सर्वत्र खळबळ उडाली

ठळक मुद्देस्मशानभूमीत शक्यतो कोळकी मधील कोणीही ग्रामस्थ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणत नाहीत. भुकेला असल्याने त्याने मृतदेह खाल्ल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.कोरोना बाधित मृत लोकांचे अवयव खाल्याने तो स्वत:ही बाधित झाला असण्याची शक्यता

फलटण - शहरालगत पंढरपूर रोडवर असलेल्या कोळकी येथील स्मशान भूमीत कोविडमुळे मृत झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात. याठिकाणी अर्धवट जळलेल्या मृतदेहांचे अवयव खाऊन भूक शमविण्याचा किळसवाणा प्रकार एका मनोरुग्णाने केला आहे. या स्मशानभूमीत दिवसरात्र बंदोबस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

फलटण शहरामध्ये कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी स्मशानभूमी शासनाने अधिग्रहित करून तेथे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी अंत्यसंस्काराची सोय आहे. फलटण तालुक्यातील अनेक गावातून कोरोना बाधित मृत रुग्णांवर फलटण नगरपालिकेच्या कर्मचाºयांकडून एक वषार्पासून अंत्यसंस्कार केले जात आहेत. दररोज दहा ते पंधरा लोकांवर कोळकीच्या कोविड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत. अंत्यसंस्कारानंतर तेथे कोणीही थांबत नाही. 

फलटण ते पंढरपूर हा रस्ता २४ तास वर्दळीचा असला तरी सध्या लॉकडाऊनमुळे  या मार्गावर वाहतूक खूपच कमी झालेली आहे. त्यामुळे रस्त्याकडेला असणाऱ्या स्मशानभूमीत वेडसर लोकांचा वावर वाढलेला आहे. काल संध्याकाळी उशिरा काही मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यावर नगरपालिकेचे कर्मचारी निघून गेले होते. सकाळी वेडसर असणाऱ्या मनोरुग्णाने जळत असणाऱ्या चितेतून मानवी अवयव काढून ते खाण्यास सुरुवात केली. जे अर्धवट जळालेले अवयव होते ते अवयव तो पुन्हा भाजून खात असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत नगरपालिकेला कळविले काही लोकांनी त्यावेळेस तर त्या वेडसर माणसाला हाकलून लावले. 

दरम्यानच्या काळात तो मानवी देहाचे अवयव खात असल्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर पसरताच सर्वत्र खळबळ उडाली. या घृणास्पद प्रकाराचा सर्वत्र निषेध झाला. कोळकी गावाच्या हद्दीत असणाऱ्या या स्मशानभूमीत मालकीहक्कावरून वाद सुरू आहे. या स्मशानभूमीत शक्यतो कोळकी मधील कोणीही ग्रामस्थ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणत नाहीत. गेल्या दोन-तीन दिवसापासून वेडसर वाटणारा सदरची व्यक्ती त्या परिसरात फिरत होती. भुकेला असल्याने त्याने मृतदेह खाल्ल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. कोरोना बाधित मृत लोकांचे अवयव खाल्याने तो स्वत:ही बाधित झाला असण्याची शक्यता आहे.

कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या स्मशानभूमीत कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार केले केले जात आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी तेथे अंत्यसंस्कार करतात. नगरपालिकेला त्या स्मशानभूमीवर खर्च टाकता येत नाही किंवा रखवालदार ही नेमता येत नाही. तेथे सोई-सुविधा आणि रखवालदार नेमण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. सदरच्या वेडसर व्यक्तीला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांकडे स्वाधीन केलेले आहे. -प्रसाद काटकर, मुख्याधिकारी फलटण नगर परिषद

मानवी मृतदेहाचे अवयव खाणाऱ्या सदर वेडसर,मनोरुग्ण व्यक्तीस संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जिंती नाका येथे फलटण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्या पकडून फलटण शहर पोलीससांकडे सुपूर्त केले आहे. त्याच्या हिंदी बोलण्यावरून तो परप्रांतीय वाटत आहे. सदर व्यक्ती मानवी मृतदेह खाण्याची चटक लागल्याने तो कोरोना बाधित होण्याबरोबर बाहेर राहिला तर खूप धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे त्याची रवानगी कोठे करावी हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तूर्तास त्याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविणार असल्याचे फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांनी सांगितले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस