उर्दू शाळेतील वीज खंडित

By Admin | Updated: September 10, 2016 03:00 IST2016-09-10T03:00:39+5:302016-09-10T03:00:39+5:30

उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेचे वीज बिल गेल्या चार वर्षात न भरल्याने थकबाकी ८० हजार रुपयांनी अधिक झाली होती.

Urdu school breaks | उर्दू शाळेतील वीज खंडित

उर्दू शाळेतील वीज खंडित


शशी करपे,

वसई- नालासोपारा गावातील जिल्हा परिषदेच उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेचे वीज बिल गेल्या चार वर्षात न भरल्याने थकबाकी ८० हजार रुपयांनी अधिक झाली होती. याप्रकरणी वारंवार नोटीसा बजावूनही बील न भरल्याने महावितरणने शाळेचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना आता विजे आभावी अंधारातच बसावे लागत आहे.
वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या एकापाठोपाठ एक शाळा बंद पडू लागल आहेत. अनेक शाळांना मुख्याध्यापक नाहीत तसेच शिक्षकांचीही कमतरता आहे. मात्र, शिक्षण खात्याच बेजबाबदारपणामुळे तक्रारी करूनही काहीच हालचाली होत नसल्याने उर्दू शाळांची अवस्था दिवसागणिक दयनिय होऊ लागली आहे. त्यातच सोपारा गावात गेल्या तीस वर्षांहून जुनी असलेल्या जिल्हा परिषदेच उर्दू माध्यमाच प्राथमिक शाळेचा वीज पुरवठा बील न भरल्याने महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी खंडीत केला आहे.
शाळेला वीज पुरवठा करणाऱ्या मीटरचे बील गेल्या चार वर्षात भरलेले नाही. आता बिलाची थकबाकी ८० हजार रुपयांहून अधिक झालेली आहे. महावितरणने बिलाची थकबाकी भरावी यासाठी अनेक नोटीसा बजावल आहेत. पण, कुणीच प्रतिसाद देत नसल्याने अखेर महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी शाळेचा वीज पुरवठा खंडीत केला. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. ढग दाटून आले की, गडद अंधार पसरत असतो. त्यामुळे अंधारात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. दरम्यान, या परिसरात अगदी गरीब घरातील लोकांची मोठी वस्ती आहे. त्यांना खाजगी शाळेत महागडी फी देऊन विशेषत: मुलींना शिकवणे परवडेनाजोगे नाही. या शाळेमुळे मुस्लीम समाजातील गरीब घरातील मुली शिक्षणाच्या प्रवाहात येऊ पाहत असताना उदासिन प्रशासनामुळे त्यांच्या शिक्षणाचा मुलभूत हक्कावरच गदा येऊ घातली आहे. या सगळ्या प्रकरणाकडे शिक्षणविभाग देखिल गंभिरतेने पाहत नसल्याची स्थिती आहे.
साडेसातशे विद्यार्थी घेतात शिक्षण
सोपारा गावात सख्खर मोहल्लामध्ये मस्जिदने दिलेल्या जागेत तीस वर्षांहून जुनी जिल्हा परिषदेची उर्दू माध्यमाची प्राथमिक शाळा आहे.
सध्या या शाळेत पहिली ते पाचवीर्पंतचे वर्ग भरत असून साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी याठिकाणी शिकत आहेत. तसेच शिशूवर्गही याठिकाणी भरत असतात.
शाळेत मुलींची संख्या मोठी आहे. याठिकाणी शिक्षकांचीही कमतरता आहे. असे असतानाही याठिकाणी मोठ्या सेख्येने गरीब वर्गातील मुले शिक्षण घेत आहेत.
मात्र, शिक्षण खात्याचे याकडे दुर्लक्ष असल्याने शाळा अनेक गैरसोयींचा सामना करीत तग धरून आहे.
>रकमेची तरतूद नसल्याने टाळाटाळ
याप्रकरणी पंचायत समिती आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण, इतक्या मोठ्या रकमेची तरतूद नसल्याचे कारण सांगून अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. विद्यार्थ्यांचे पालक गरीब वर्गातील आहेत. वीज पुरवठा सुरु झाला नाही तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती आहे. काही सेवाभावींची मदत घेऊन बिल भरण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण, यावर कायमस्वरुपी तोडगा निघायला हवा असे माजी उपमहापौर सगीर डांगे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Urdu school breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.