शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोपेक्षा आधुनिक आणि आरामदायी, लवकरच मुंबईकरांसाठी धावणार २३८ नव्या एसी लोकल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 06:50 IST

Mumbai AC Local: मुंबईची 'लाईफलाईन' आता अधिक हायटेक होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

मुंबईकरांसाठी २३८ नवीन एसी लोकल दाखल होणार असून, त्या मेट्रोपेक्षा आधुनिक आणि आरामदायी असतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे दिली. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३,९२६ कोटींची तरतूद करण्यात आली असून सध्या राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

एसी लोकलसाठी निविदा काढण्यात आली आहे. लोकलची गर्दी लक्षात घेऊन प्रवास सुसह्य हाेण्याच्या दुष्टीने डब्यांची अंतर्गत रचना करण्यात आली आहे.  त्यामुळे मुंबईकरांची नवी लाइफलाइन मेट्रोपेक्षा अधिक सक्षम, जलद आणि आरामदायी असेल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला. रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, “फलाटांची लांबी वाढवण्याचेही काम सुरू आहे. १५ डब्यांच्या लोकलसाठी हे फायदेशीर ठरेल. सध्या दररोज ३,४०० लोकल फेऱ्या सुरू  आहेत. तसेच पाचव्या सहाव्या मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.” 

मुंबई-अहमदाबाद पहिली बुलेट ट्रेन पुढील वर्षी धावणार  

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ पर्यंत सुरू होणार आहे. ती गुजरातमध्ये पहिल्यांदा धावणार आहे. सुरुवातीला १ ते २ तासांच्या अंतराने आणि मागणी वाढल्यास पीक अवरमध्ये १५ मिनिटांत एक ट्रेन चालवली जाऊ शकते. तिकीटदर सर्वसामान्यांना परवडणारे असतील, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.  

राज्यासाठी दोन नवीन बुलेट ट्रेन प्रकल्प मंजूर

राज्यासाठी दोन नवीन बुलेट ट्रेन प्रकल्प मंजूर करण्यात आले असून मुंबईहून पुण्याला अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचता येईल. आयटी, स्टार्टअप्स आणि औद्योगिक क्षेत्रासाठी बुलेट ट्रेन फायदेशीर ठरेल. पहिल्या टप्प्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल, तर दुसऱ्या टप्प्यात ७ नवीन बुलेट ट्रेन प्रकल्पांसाठी तरतूद केली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai to Get New AC Locals: Modern, Comfortable, and Fast!

Web Summary : Mumbai will soon get 238 new AC local trains, more modern than the metro. Railway Minister Vaishnav announced railway projects worth ₹23,926 crores for Maharashtra. Mumbai-Ahmedabad bullet train's first phase will start by 2027 in Gujarat. Two new bullet train projects are approved for Maharashtra.
टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र