किरणे कंबरेपर्यंतच

By Admin | Updated: November 11, 2015 23:42 IST2015-11-11T23:02:03+5:302015-11-11T23:42:32+5:30

अंबाबाई किरणोत्सव : इमारती, प्रदूषण, फांद्यांचा अडथळा

Until radiation shakes | किरणे कंबरेपर्यंतच

किरणे कंबरेपर्यंतच

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवात बुधवारी तिसऱ्या दिवशी उंच इमारती, हवेतील प्रदूषण, वाढलेल्या झाडांच्या फांद्या, अशा अडथळ्यांमुळे किरणे देवीच्या कमरेपर्यंतच पोहोचली.
पहिले दोन दिवस निराशा झाल्याने अखेरच्या दिवशी बुधवारी किरणोत्सव सोहळा पूर्ण होईल, या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. त्यामुळे दुपारी चार वाजताच मंदिर तुडुंब भरले होते. सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी किरणांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. यावेळी किरणांची तीव्रता १९ लक्स इतकी कमी झाली होती, तर सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी किरणे देवीच्या पायावर पोहोचली होती. किरणोत्सव पूर्ण होणार, अशी अपेक्षा असताना किरणांची तीव्रता कमी झाली आणि किरणे केवळ देवीच्या कंबरेपर्यंतच येऊन थांबली. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही अंबाबाई देवीच्या मुखापर्यंत किरणे पोहोचू शकली नाहीत.
तत्पूर्वी किरणांना देवीच्या मुखापर्यंत पोहोचण्यासाठी कोणता गोष्टींचा अडथळा ठरतो. त्याचा अभ्यास करण्यासाठी केआयटी इंजिनिअरिंग कॉलेज, विवेकानंद कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह चंद्रकांत परूळेकर, प्रा. उदय गायकवाड, प्रा. किशोर हिरासकर, डॉ. एम. एम. कारंजकर हजर होते. त्यांनी किरणांचा प्रवास लक्स या युनिटमध्ये मोजला. त्यानुसार सायंकाळी ४ वाजून ४६ मिनिटांनी किरणे महाद्वार रोडवर पोहोचली. यावेळी किरणांची तीव्रता २१,३०० लक्स होती, तर किरणे गरुड मंडपाबाहेर सायंकाळी ४ वाजून ४८ मिनिटांनी पोहोचली. त्यावेळी किरणांची तीव्रता २० हजार ५०० लक्स इतकी होती. सायंकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी किरणे गरुड मंडपात पोहोचली. यावेळी किरणांचा वेग ६ हजार १०० लक्स इतका होता. सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी किरणांचा स्पर्श पितळी उंबरठ्यावर झाला. सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी किरणे पहिल्या पायरीवर पोहोचली, तर सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी किरणांनी दुसरी पायरी गाठली.


‘दक्षिणायन’मध्ये किरणांची तीव्रता ही कमीच असते, तरीही हवेचा दाब १००६ एअर प्रेशर युनिट होता. त्यात साकोली कॉर्नर, कपिलतीर्थ, रंकाळा तलावाजवळील उंच इमारती आणि हवेतील प्रदूषणाचा मुख्य अडथळा अंबाबाई देवीच्या किरणोत्सवात ठरत आहेत.
- प्रा. डॉ. एम. एम. कारंजकर


परदेशी पर्यटकांची उपस्थिती
डेक्कन ओडिसीने बुधवारी सकाळी कोल्हापुरात आलेल्या प्रवाशांमधील परदेशी पर्यटकांनीही किरणोत्सव पाहण्यासाठी हजेरी लावली होती. त्यांच्याबरोबर परराज्यांतीलही प्रवासी हा सोहळा पाहण्यासाठी खास करून आले होते. या सर्व पर्यटकांनी किरणोत्सवाअगोदर ५ वाजून २० मिनिटांनी देवीचे दर्शन घेतले.
‘लक्स’ किरणे मोजण्याचे एकक
‘एक लक्स म्हणजे एका मेणबत्तीचा उजेड’ असे साधारण प्रमाण मानले जाते. त्यामुळे देवीवर पडणाऱ्या किरणांची तीव्रता ४ वाजून ४८ मिनिटांनी २० हजार ५०० लक्स इतकी होती म्हणजे इतकी किरणांची तीव्रता असतानाही ती देवीपर्यंत पोहोचण्यास कमी पडली.

Web Title: Until radiation shakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.