मंत्रिपदासाठी भाजपाच्या 'या' आमदारांना अज्ञाताचा फोन; नेमकं काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 14:45 IST2022-07-20T14:39:59+5:302022-07-20T14:45:53+5:30
आम्हाला अडकवायचा प्रयत्न नव्हता. पहिल्या फोनपासून आम्हाला हा माणूस बनावट असल्याचं दिसून आले असं भाजपा आमदाराने स्पष्ट केले.

मंत्रिपदासाठी भाजपाच्या 'या' आमदारांना अज्ञाताचा फोन; नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई - राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं प्रशासन सांभाळत आहेत. सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे कॅबिनेट विस्तार लांबला आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मात्र याच संधीचा फायदा घेत काही महाठगांनी भाजपा आमदारांना फोन करत मंत्रिपदासाठी पैशाची मागणी केली.
भाजपा आमदार राहुल कुल म्हणाले की, मला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मी त्याला ओळखत नव्हतो. मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करू शकतो. प्रथमदर्शनी मला संशय आला. ही माहिती मी वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिसांनी या प्रकरणात सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. सध्या तपास सुरू आहे. फसवणुकीला बळी पडू नये यासाठी आम्ही पुढाकार घेतला असं त्यांनी सांगितले.
१०० कोटीत कॅबिनेट मंत्रिपद?; 5 स्टार हॉटेलमध्ये आमदारासोबत झाली बैठक अन्...
त्याचसोबत आम्हाला अडकवायचा प्रयत्न नव्हता. पहिल्या फोनपासून आम्हाला हा माणूस बनावट असल्याचं दिसून आले. आम्ही नेत्यांशी चर्चा करून संबंधित व्यक्तीने अन्य कुणाला फसवू नये यासाठी आम्ही त्याच्या संपर्कात होतो. या प्रवृत्तीला अटकाव घालायला हवा म्हणून फडणवीसांनी पोलिसांना सूचना दिल्या. आमचा एकाशी संपर्क झाला. बाकी कुणाच्या संपर्कात आम्ही नव्हतो. फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणं हाच उद्देश होता असं भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण?
एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून मुंबई क्राइम ब्रांचनं ४ आरोपींना अटक केली आहे. त्यात रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी यांचा समावेश आहे. किला कोर्टाने या सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत क्राईम ब्रांच कस्टडीत पाठवले आहे. FIR नुसार, आमदार ते मंत्री बनण्यासाठी आरोपींनी १०० कोटींची मागणी केली होती. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठक झाली. मुंबई क्राईम ब्रान्चने मंगळवारी किला कोर्टात या प्रकरणात खुलासा केला. आरोपी रियाज शेखनं आमदाराच्या सचिवाला अनेकदा फोन करू आमदारांची ४ वाजता बैठक आहे परंतु ते फोन उचलत नाही अशी बतावणी केली. त्याच संध्याकाळी ४.३० वाजता दक्षिण मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल बैठकीला बोलावले. रियाजचा वारंवार आमदाराच्या पीएला फोन आला. त्यात तुम्हाला १०० कोटीमध्ये कॅबिनेट मंत्री बनवतो अशी ऑफर दिली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्या.