बढिया भाऊ!! वाहतूक कोंडी पाहून नितीन गडकरी स्वतःच गाडीतून उतरले, अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 19:18 IST2021-06-18T19:13:44+5:302021-06-18T19:18:43+5:30
नागपुरातील वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना खुद्द केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना करावा लागला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

बढिया भाऊ!! वाहतूक कोंडी पाहून नितीन गडकरी स्वतःच गाडीतून उतरले, अन्...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे भंडारा रोडवर वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे. येथे नेहमीच वाहतूक जाम होत असते. केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना स्वत: शुक्रवारी या समस्येचा सामना करावा लागला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गडकरी कारमधून उतरले आणि स्वत: वाहतूक व्यवस्था ठीक करू लागले. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताची वेळ होती. भवानी मंदिर येथे ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यासाठी गडकरी पारडीला जात होते. त्यांचा ताफा जेव्हा पारडी उड्डाणपुलाजवळ पोहोचला, तेव्हा तेथील वाहतूक व्यवस्था अगदीच बिघडलेली होती. गडकरी तातडीने कारमधून उतरले आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदत करू लागले. गडकरी यांना पाहून परिसरातील लोकही जमले. याावेळी गडकरी यांनी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांचाही ‘क्लास’ घेतला. अतिक्रमणामुळे लोकांना वाहतुकीला कसा त्रास होतोय, हे समजावून सांगितले.
यानंतर लोकांना समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. गडकरी यांना यावेळी पारडी उड्डाणपुलाचे कााम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.