शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, साताऱ्याच्या दुष्काळी तालुक्यातून नवा पुणे-बेंगलोर महामार्ग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 13:35 IST

सध्याच्या पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार

सांगली : सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या दुष्काळी तालुक्यांतून जाणाऱ्या नव्या पुणे-बेंगलोर महामार्गाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची तरतुद केली जाणार असून यामुळे सध्याच्या पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल असे ते म्हणाले.सांगलीत महामार्ग लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी - नागपूर महामार्गांतर्गत सांगली ते सोलापूर दरम्यानच्या बोरगाव ते वाटंबरे आणि सांगली-सोनंद जत या महामार्गांचे लोकार्पण त्यांनी डिजीटल पद्धतीने केले. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विक्रम सावंत, जयंत आसगावकर, अरुण लाड, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुभाष देशमुख, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज देशमुख, प्राजक्ता कोरे आदी उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, प्रस्तावित पुणे-बेंगलोर महामार्ग पुणे, सातारा, खंडाळा, फलटण, खटाव, खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ असा होईल. पुण्यात रिंग रोडला जोडला जाईल. यानिमित्ताने मुंबई ते बेंगलोर असा थेट महामार्ग अस्तित्वात येईल. महामार्गांच्या कामावेळी आम्ही स्वखर्चाने शेतकऱ्यांना शेततळी काढून देऊन, तेथील माती, दगड आदी साहित्य महामार्गासाठी वापरु. यानिमित्ताने जलसंधारणाचेही काम होईल. रांजणीजवळ दोन हजार हेक्टर जागा असल्याचे कळते. सरकारने ती जागा मला द्यावी. तेथे ड्रायपोर्ट, लॉजिस्टीक पार्क, सॅटेलाईट पार्क उभा करु. विमान उतरेल असा साडेतीन किलोमीटरचा कॉंक्रीटचा रस्ता तयार केला जाईल. पोर्टसाठी अर्धा-अर्धा खर्च राज्य व केंद्र शासन करेल.महामार्गांवर सर्व लोहमार्गांवर आम्ही भुयारी रस्ते किंवा उड्डाण पूल उभारले. शहरांतही अनेक ठिकाणी लोहमार्ग आहेत. या सर्व ठिकाणी पूल किंवा भुयारी रस्ते उभारुन महाराष्ट्र फाटकमुक्त करण्याचा निर्धार आहे. महामार्गांवर १२० प्रतितास या गतीने प्रवासाला परवानगी देणार आहोत. नव्या महामार्गांसाठी केंद्र शासन ४० टक्के सिमेंट आणि स्टीलचा वापर करते, पण कंपन्यांनी काळाबाजार सुुरु केला, त्यामुळे आता बुटामीनचा वापर वाढविणार आहोत. अन्नदाता असणारा शेतकरी यानिमित्ताने उर्जादाताही बनेल. बुटामीनसाठी दिल्लीत लवकरच बैठक घेणार आहे. महामार्गांसाठी त्याचा वापर सक्तीचा करणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी