'नवाब मलिक दुसऱ्यांच्या शर्ट- पँट पाहण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:45 IST2021-11-05T15:45:08+5:302021-11-05T15:45:15+5:30

मुंबई: एनसीबी(NCB)चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात मागील काही दिवसांपासून ...

Union Minister Narayan Rane slams NCP leader Nawab malik Over Sameer Wankhede sase | 'नवाब मलिक दुसऱ्यांच्या शर्ट- पँट पाहण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?'

'नवाब मलिक दुसऱ्यांच्या शर्ट- पँट पाहण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?'

मुंबई: एनसीबी(NCB)चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र पाहाया मिळत आहे. मलिक यांनी वानखेडेंवर हजारो-लाखो रुपयांच्या वस्तु वापरतात,कपडे घालतात असा अरोप केला आहे. त्यावरुन आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधलाय.

तुमचं बाहेर काढल्यावर अवघड होईल...
आज नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचीही खरडपट्टी घेतली. नवाब मलिक लोकांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या बेडरुममध्ये जातातच कशाला? ही चांगली सवय नाही, असा सणसणाटी टोला राणेंनी मलिक यांना लगावला. तसेच, कोण कितीचं काय वापरतंय, याचं मलिकांना काय कराचयंय, त्यांचं त्यांनी पाहावं. तुमचं काही बाहेर काढलं तर अवघड होईल, असा इशाराही नारायण राणेंनी मलिकांना दिला.

'संजय राऊत सरकलाय'
यावेळी पत्रकार परिषदेत राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राणे म्हणाले की, संजय राऊतांचे अग्रलेख वाचत होतो, कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे, तुम्ही एकने धडक मारणार ? संजय राऊत सरकलेला माणुस आहे. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. आता तुमचे 56 आमदार आहेत, ते मोदींमुळेच निवडून आलेत. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असंही राणे यावेळी म्हणाले.

राणेंनी हेडिंगच वाचून दाखवल्या
नारायण राणेंनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत शरद पवार यांचे कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. यावेळी राणेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. आज मात्र ते पवार आणि काँग्रेसचे गुणगाण गात आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
 

Web Title: Union Minister Narayan Rane slams NCP leader Nawab malik Over Sameer Wankhede sase