Maharashtra Political Crisis: “आमदारांनी नाही, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय”; नारायण राणेंचे वर्मावर बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 15:04 IST2022-08-30T15:02:49+5:302022-08-30T15:04:55+5:30
Maharashtra Political Crisis: भाजप आणि जनतेशी गद्दारी करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली.

Maharashtra Political Crisis: “आमदारांनी नाही, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय”; नारायण राणेंचे वर्मावर बोट
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) राज्यभरातून वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. यातच दसऱ्या मेळाव्यावरुन विरोधकांनी शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करत वर्मावरच बोट ठेवल्याचे सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी अनेकदा शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही. तर स्वतः उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केली, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे सारख्या कडवट शिवसैनिकाशी गद्दारी
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सारख्या कडवट शिवसैनिकाशी गद्दारी केली. पक्षातील आमदारांना कधीच सहकार्य केले नाही. जे काम केले ते फक्त नातेवाईक आणि मोतश्रीसाठी केल्याची टीका राणे यांनी केली आहे. भाजप आणि जनतेशी गद्दारी करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, असेही राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलण्याची सब कंत्राटे भाजपने काढली आहे. आणि ही सब कंत्राटे मिळवण्यासाठी अनेक नेते फार उतावीण पद्धतीने पुढे आलेले आहेत. नवनीत राणा, नारायण राणे आणि राज ठाकरे ही सगळी मंडळी कंत्राट मिळवण्यासाठी फार उत्सुक आहेत. आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की, मुख्यमंत्री पदावर नसतानाही उद्धव ठाकरेंमुळे राजकीय रोजगार हमी योजनेची कामे या सगळ्यांना मिळू शकत आहेत, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.