शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

दुर्दैवी...नाशिकमध्ये स्कार्फ फास लागून नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 20:54 IST

झोळीत झोपलेली चिमुकली पडू नये या काळजीपोटी बांधलेल्या स्कार्फचाच फास लागून नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यु

ठळक मुद्देसातपूरच्या शिवाजीनगरमध्ये घटना ; परिसरात हळहळ

नाशिक : झोळीत झोपलेली चिमुकली पडू नये या काळजीपोटी बांधलेल्या स्कार्फचाच फास लागून नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये सोमवारी (दि़२३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ आराध्या योगेश खाडपे (समर्थ रेसीडेन्सी, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे़

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या शिवाजीनगरमधील समर्थ रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये योगेश खाडपे हे पत्नी व नऊ महिन्यांची मुलगी आराध्यासह राहातात़ सोमवारी (दि़२३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी मनिषा खाडपे यांनी मुलगी आराध्या हिस घरातील झोळीमध्ये झोपण्यासाठी टाकले. मुलगी झोळीतून ती खाली पडू नये या काळजीने त्यांनी झोळीला स्कार्फने बांधला व त्यानंतर घरकामामध्ये व्यस्त झाल्या़

या दरम्यान, चिमुकली आराध्या ही झोळीतून सरकत-सरकत खाली असता, झोळीला बांधलेल्या स्कार्फ तिच्या गळ्याभोवली अडकून तिला गळफास बसला़ ही बाब आई मनिषा खाडपे यांच्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. योगेश खाडपे यांनी बेशुद्ध अवस्थेतील आराध्यास दुपारी तीन वाजेच्या सुमारास तातडीने जिल्हा रुग्णालयातदाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, यापुर्वीही नाशिक शहरात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चिमुकल्यांचे मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत़ लहान मुले खेळत असताना वा झोपलेले असताना घरातील सदस्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे़--इन्फो--नाशिक शहरातील दुर्दैवी घटना* १० आॅगस्ट २०१७सिडकोतील हनुमान चौकात आठ महिन्यांच्या वीर विनोद जयस्वाल या चिमुकल्यास खेळण्यासाठी दिलेला फुगा त्याच्या घशात अडकून श्वासोच्छवास बंद होऊन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १० आॅगस्ट २०१७ रोजी घडली होती़

* ३० जानेवारी २०१८अशोका मार्गावरील जेएमसीटी महाविद्यालयामागील सोसायटीतच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने चार वर्षाच्या हसनेन मोईन सय्यद या एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ३० जानेवारी २०१८ रोजी घडली होती़

*५ फेब्रुवारी २०१८नाशिकरोडजवळील चांदगिरी येथील चार वर्षीय मुलगी शालिनी दत्तात्रय हांडगे ही रडत असल्याने तिच्या आईन खाऊसाठी दहा रुपयांचे नाणे दिले होते़ शालिनी हीने हे नाणे आईच्या नकळत गिळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती़

*१६ फेब्रुवारी २०१८सिडकोतील हनुमान चौकात घरात खेळत असलेला एक वर्षीय सुजय जयेश बिजुटकर या चिमुकल्याच्या घशात हरभºयाचा दाणा अडकल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १६ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती़

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यूPoliceपोलिस