शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा गाव करा, एक कोटीचे अनुदान मिळवा; राज्यात ६३ गावांची निवड

By भीमगोंड देसाई | Updated: July 10, 2025 18:00 IST

प्रत्येक जिल्ह्यात एक होणार मॉडेल सौर गाव

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यात येणार आहे. यासाठीच्या स्पर्धेसाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा जिल्ह्यांतील ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. सहा महिन्यांत स्पर्धेतील गावांपैकी सर्वाधिक सौरऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या गावाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे.राज्यातील शंभर गावे सौरऊर्जेच्या वापरावर स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत १४ गावे सौर ग्राम झाली आहेत. केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेमुळे गावांना ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यास चालना मिळणार आहे. मॉडेल सौर ग्राम योजनेसाठी महावितरण नोडल एजन्सी आहे. किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांना मॉडेल सौर ग्राम योजनेसाठीच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी आहे. विविध जिल्ह्यांमध्ये गावे निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सध्या सहा जिल्ह्यांतील ६३ गावांची योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना घरोघरी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्या गावातील पथदिवे, पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवण्यात येणार आहे. यासाठीच्या स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर त्या-त्या गावात एकूण किती सौरऊर्जा क्षमता निर्माण झाली याचा अभ्यास करून जिल्ह्यातील विजेत्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

जिल्हानिहाय निवड झालेल्या गावांची संख्या अशी...मॉडेल सौर ग्राम योजनेसाठी अकोला जिल्ह्यातील २६, भंडारा येथील ६, बुलढाणा १५, वर्धा येथील ९ आणि गोंदिया जिल्ह्यातील एका गावाची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी या गावांचे परीक्षण नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत करण्यात येणार आहे.

वैयक्तिक लाभार्थीस ७८ हजारांपर्यंत अनुदानयोजनेतील पात्र लाभार्थीस महिना तीनशे युनिटपर्यंतची घरगुती वीज मोफत आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळण्यासाठी घरावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक किलोवॉटला तीस हजार रुपये, दोन किलोवॉटला साठ हजार रुपये आणि तीन किलोवॉटला ७८ हजार रुपये अनुदान मिळते.