विधानसभा मुंडेंच्या नेतृत्वाखालीच
By Admin | Updated: May 30, 2014 02:18 IST2014-05-30T02:18:08+5:302014-05-30T02:18:08+5:30
मोदी लाटेवर स्वार होत ऐतिहासिक विजय नोंदवणार्या प्रदेश भाजपाला आता मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत.

विधानसभा मुंडेंच्या नेतृत्वाखालीच
मुंबई : मोदी लाटेवर स्वार होत ऐतिहासिक विजय नोंदवणार्या प्रदेश भाजपाला आता मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय भाजपा संसदीय मंडळच घेईल. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक खा. गोपीनाथ मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी सांगितले. प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तावडे यांनी राज्यातील मुख्यमंत्रीपद, निवडणुकीतील जागावाटपाच्या सूत्राबाबत भाष्य करत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्रीपदाबाबतचा अंतिम निर्णय भाजपा संसदीय मंडळ घेईल, असे सांगतानाच जागावाटपासह सर्वच बाबतीत फेरविचार करण्यात येणार असल्याचे तावडे म्हणाले. महायुतीतील जागावाटपात विजयी होऊ शकणार्या उमेदवाराचा विचार करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचे अथवा अन्य कोणता फॉर्म्युला निश्चित करायचा, याबाबत महायुतीतील सर्व नेते एकत्र निर्णय घेतील, असे तावडे म्हणाले. (प्रतिनिधी)