शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांवर अन्याय, वैद्यकीय शिक्षणासाठी पुन्हा ‘नीट’ची अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 16:55 IST

केंद्र सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना १ मे २०१८ पासून एमसीआयची पात्रता प्रमाणपत्र परीक्षा (नीट) अनिवार्य केली आहे. त्यामुळे अमेरिका, जर्मनी व फिलिपाइन्समध्ये एमबीबीएसला प्रवेशित विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणार असून, याकरिता मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

अमरावती : केंद्र सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना १ मे २०१८ पासून एमसीआयची पात्रता प्रमाणपत्र परीक्षा (नीट) अनिवार्य केली आहे. त्यामुळे अमेरिका, जर्मनी व फिलिपाइन्समध्ये एमबीबीएसला प्रवेशित विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणार असून, याकरिता मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी शेकडो पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे.मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय)े ने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी  ६ मे २०१८ रोजी नीट परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. या बाबीचा फटका सन २०१७ मध्ये परदेशात एमबीबीएसला प्रवेशित विद्यार्थ्यांना बसणार आहे. विशेषत: अमेरिका, जर्मनी व फिलिपाइन्स या देशांमध्ये पहिल्या वर्षाचे प्रवेश प्री-मेडिकल कोर्स गणले जात असल्याने याचा मूळ कालावधी आॅगस्ट २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी एमसीआयने ६ मे रोजी नीट परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे सन २०१७ मध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण करून परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात परत येऊन पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. फिलिपाइन्स, अमेरिका व जर्मनी येथे बीएस, एमडी या पाच वर्षीय वैद्यकीय शिक्षणाला भारतात एमबीबीएस म्हणून मान्यता दिली, तर रशिया, चीन व अन्य देशात एमबीबीएस/एमडीला एमबीबीएस म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मात्र, रशिया, चीनमध्ये वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट मिळाली, हे विशेष.रशिया, चीन व अन्य देशात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास बारावी विज्ञान (पीसीबी) मध्ये ५० टक्के गुण मिळवून एमसीआयचे पात्रता प्रमाणपत्र दिले जाते. परंतु, फिलिपाइन्स, अमेरिका व जर्मनीमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना पीसीबी ग्रुप घेऊनदेखील सन २०१७ मध्ये नीट ब्रेक देऊनही पात्रता प्रमाणपत्र दिलेले नाही. येथे बीएस शिक्षण पूर्ण झाल्यावर एमडी प्रवेश घेतेवेळी एमसीआयचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे आता फिलिपाइन्स येथे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे भारत सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये सूट देऊन होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.खासदार अडसुळांचे पंतप्रधानांना पत्रभारतातून फिलिपाइन्समध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी सन-२०१७ मध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना एमसीआयच्या नीट परीक्षेतून सूट द्यावी, याबाबतचे पत्र अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २६ फेब्रुवारी रोजी दिले. एमसीआयच्या नवीन नियमावलीचा फटका परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना बसत असून, प्रवेशासाठी अगोदरच पालकांचा बराच खर्च झाल्याचेही नमूद आहे.परदेशात वैद्यकीय उच्च शिक्षणाला अगोरदच नीट परीक्षा देऊनच प्रवेश मिळविला. मात्र, एमसीआयने पुन्हा नीट परीक्षा घेण्याचे निश्चित केल्याने याचा फटका परदेशात गेलेल्या विद्यार्थ्याना बसणार आहे. खासदार अडसुळांमार्फत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन व्यथा मांडू. अरुणा संजय चौधरी, पालक, अमरावती.

टॅग्स :educationशैक्षणिक