अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नये

By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:18+5:302016-06-07T07:42:18+5:30

रायगड जिल्ह्यातील विनापरवानगी सुरू असलेल्या शाळेत पालकांनी आपल्या पाल्यास दाखल करु नये,

Unauthorized schools should not be admitted | अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नये

अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नये


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विनापरवानगी सुरू असलेल्या शाळेत पालकांनी आपल्या पाल्यास दाखल करु नये, अन्यथा विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या संभाव्य शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी शासनावर राहणार नाही, असे आवाहन पालकांकरिता करण्यात येत आहे. १५ जून रोजी शाळा सुरु झाल्यावर जिल्ह्यात ज्या शाळा अनधिकृत निष्पन्न होतील त्यांच्यावर १ लाख रुपये एक रकमी आणि पुढील प्रत्येक दिवसास १० हजार रुपये अशी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एस.एन.बढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. एकूण ३६ शाळा जिल्ह्यात अनधिकृत असल्याचे बढे यांनी सांगितले.
>पनवेल तालुका - १.लेट मंजुला त्रिंबक ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल पाले बु., २. आदर्श एज्युकेशन सोसायटी आयडीयल पब्लिक स्कूल देवीचा पाडा, ३. शारोन इंग्लिश स्कूल नेरे, ४. प्लेजंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा, ५. आनंदी दिनकर कोळी शिक्षण प्रसारक संस्था ज्ञानायी सेकंडरी स्कूल धामणी, ६. न्यू इंग्लिश स्कूल सुकापूर, ७. एसईअ‍े अँड वुय ट्रस्ट मा आशा हिंदी स्कूल सुकापूर, ८. लेट बालाजी कान्हा पाटील हायस्कूल मोहा, ९. श्री.गणपती इंग्लिश मिडीयम स्कूल शिवकर, १०. प्लेजंट इंग्लिश मिडीयम स्कूल प्रायमरी अँड प्रीपायमरी सांगाडे, ११. न्यू इंग्लिश स्कूल चिंचपाडा, १२.लेट चांगुबाई ज्ञानदेव ठाकूर एज्युकेशन सोसायटी प्रायमरी स्कूल उलवा, १३. पराशक्ती इंग्लिश मिडीयम स्कूल आपटा, १४. होली स्पीरीट इंग्लिश स्कूल आपटा, १५. सुविधा विद्यालय कामोठे प्रायमरी इंग्लिश, १६. ह.भ.प. दामाजी गणपत गोवारी विद्यालय कामोठे प्राथमिक इंग्लिश, १७. ह.भ.प. दामाजी गणपत गोवारी विद्यालय माध्यमिक कामोठे इंग्लिश, १८. रायगझिंग सन प्री. प्रायमरी स्कूल कामोठे, १९. द इलाईट पब्लिक स्कूल तळोजे (सीबीएससी)
खालापूर तालुका - १. टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी, २. सेंट विन्सेट पलोटी स्कूल रिस, ३. सेंट फ्रान्स केब्रीज इंटरनॅशनल स्कूल दूरशेत, ४.सुभाष पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल-ताकई
महाड तालुका- १.सावित्रीबाई जंगम इंग्लिश मिडीयम स्कूल नागाव, २. कै.सीताराम शिवराम कदम इंग्लिश मिडीयम स्कूल बिरवाडी,
माणगांव तालुका- १.सरखोत इंग्लिश मिडीयम स्कूल गोरेगांव, २.फलाई इंग्लिश मिडीयम स्कूल माणगांव,
श्रीवर्धन तालुका- १.जनता शिक्षण एसएस इंग्लिश मिडीयम स्कूल बोर्ली पंचतन, २. डॉ. ए.आर.उंड्रे इंग्लिश स्कूल रानावली,
पेण तालुका- १.न्यू ब्राईट कामार्ली पेण, राधाकृष्ण एज्युकेशन सोसायटी प्राथमिक विद्यालय वढाव, २.गुरु कुल इंग्लिश स्कूल वडखळ, ३. कुणाल पब्लिक इंग्लिश प्राथमिक शाळा वडखळ,
मुरु ड तालुका- ओंकार विद्यामंदिर मुरु ड,
रोहा तालुका- रायगड एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा चणेरा,
अलिबाग तालुका-
श्री लक्ष्मीनारायण प्राथमिक विद्यामंदिर,
उरण तालुका-
सेट स्टीफन्स प्रायमरी स्कूल जासई.
कर्जत तालुका- प्राथमिक विद्यामंदिर दहिवली नीड,

Web Title: Unauthorized schools should not be admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.