शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

बीटीच्या ३५ लाख पाकिटांची विनापरवाना विक्री, तणनाशक तंत्रज्ञानाचा अवैध वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 19:01 IST

राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांत तणनाशक निरोधक बी.टी. बियाण्याची ३५ लाख पाकिटे अवैधरीत्या विकली गेली आहेत..

अमरावती : राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांत तणनाशक निरोधक बी.टी. बियाण्याची ३५ लाख पाकिटे अवैधरीत्या विकली गेली आहेत. तणनाशक तंत्रज्ञानाचा विनापरवानगीने वापर करण्यात आल्यानेच शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप करून शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाला घरचा आहेर दिला आहे. मोन्सँटो कंपनीचे तणनाशक निरोधक (राऊंडअप बी.टी.) तंत्रज्ञानाचा विनापरवानगी वापर करून देशभरात  ४७२ कोटी रुपयांच्या ३५ लाख पाकिटांची विक्री झाली व या बियाण्याचा वापर करून सुमारे साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली, असे अतिशय धक्कादायक सत्य समोर आले आहे. त्यामुळे  तणनाशक निरोधक बी.टी. बियाणे आलेच कसे, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली. 

केंद्राची जेनेटिक इंजिनीअरिंग अपरायजल कमिटी , भारत सरकारची कृषी संशोधन परिषद व कापूस संशोधन संस्थेची तसेच कृषी विद्यापीठाची अवैध बियाणे रोखण्याची जबाबदारी आहे. अशा बियाण्यांना परवानगी देण्यासाठी कायदे, नियम आहेत. केंद्रीय कापूस अनुसंधान परिषद, कृषी परिषदेसह विविध संस्थांचे अशा बियाण्यांवर नियंत्रण असते. त्यांच्या मान्यतेविना असे बियाणे देशात येतच नाहीत. अशा स्थितीत हे बियाणे आलेच कसे, असा  सवाल त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण देशात हा गोरखधंदा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या हातमिळवणीमुळेच चालत  असावा, असा आरोपही  तिवारी यांनी केला.सरकारी यंत्रणांचे हितसंबधच कारणीभूतगेल्या दोन-तीन वर्षांपासून तणनाशक निरोधक राऊंडउप बी.टी.  बियाण्यांचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम शेतकºयांचे आरोग्य आणि जमिनीवर होत आहे. पेरणी झालेल्या परिसरात कॅन्सर, किडनीचे आजार बळावत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद आहे.  तंत्रज्ञान लीक होत नाही. सरकारच्या विविध संस्थांचे बियाणे, खत व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांशी हितसंबंध यात गुंतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी