Ulhasnagar: उल्हासनगरात गावठी कट्ट्यासह एकाला अटक, पुढील तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:47 IST2025-10-31T18:46:33+5:302025-10-31T18:47:27+5:30
Ulhasnagar Crime: उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने कल्याण पूर्व येथून गावठी कट्टा व जिवंत काडतूससह एकाला सापळा रचून अटक केली.

Ulhasnagar: उल्हासनगरात गावठी कट्ट्यासह एकाला अटक, पुढील तपास सुरू
उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने खडेगोळवली, कोळसेवाडी कल्याण पूर्व येथून गावठी कट्टा व जिवंत काडतूससह एकाला सापळा रचून अटक केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याच्याकडे गावठी कट्टा आला कुठून याबाबत तपास करीत आहे.
उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत एक जण गावठी कट्टा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित इसम अमित तिलकराम चौधरी याला भानुशालीनगर, जैन मंदिराजवळ, खडेगोळवली कोळसेवाडी कल्याण पूर्व येथून अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व जिवंत काडतूस मिळून आले. देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे पंचनामा करीत जप्त केले. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिस ठाणे येथे कायदेशीर फिर्याद देऊन गुन्हा दाखल केली आहे. अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी दिली.