शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात ४२ हजार पाणी मीटर

By admin | Updated: February 2, 2015 04:52 IST

शहरात २७८ कोटींच्या पाणीवितरण योजने अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पाणीपुरवठा समप्रमाणात होण्यासाठी ४२ हजार मीटर बसविण्यात येत आहेत

उल्हासनगर : शहरात २७८ कोटींच्या पाणीवितरण योजने अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पाणीपुरवठा समप्रमाणात होण्यासाठी ४२ हजार मीटर बसविण्यात येत आहेत. मात्र, आता चोरांनी या मीटरकडे मोर्चा वळविला आहे. हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मीटरची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.उल्हासनगरात पाणीवितरण योजने अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. याचबरोबर १३ जलकुंभ आणि पम्पिंग स्टेशन उभारली आहेत. पाणीवितरण समप्रमाणात होण्यासाठी प्रत्येक नळजोडणीला मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पाणी वापरण्यावर नियंत्रण ठेवता येणार असून, अपव्यय टाळणे शक्य होणार आहे. पाणी मीटरमुळे पाणी वापरण्यावर निर्बंध येणार असल्याने काही नागरिक मीटर बसविण्यास विरोध करीत आहेत. नागरिकांच्या विरोधामुळे १२ हजार मीटर सहा महिन्यांपासून पडून आहेत. पाणीवितरण योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. निधीअभावी काम संथ गतीने सुरू आहे. या वर्षात योजना पूर्णत: कार्यन्वित होऊन शहरवासीयांना मुबलक पाणी मिळणार आहे. तसेच ३८ टक्के पाणीगळती बंद होऊन लाखो लीटर पाण्याची बचत होणार आहे. (प्रतिनिधी)