शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

उजनी धरण भरले हो काठोकाठ, पण यंदा 'फ्लेमिंगो'नेच फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 19:21 IST

तापमान, वाऱ्याची दिशा आणि लहरींचे अचूक ज्ञान पक्ष्यांना असते.

ठळक मुद्देपट्टकादंब, चक्रवाकचे दर्शन : लांबलेला पावसाळा, हवामान बदलामुळे उशिरा स्थलांतर

पुणे : यंदा हवामानात खूप बदल झाले आहेत. त्यामुळे भिगवण परिसरात पक्ष्यांची संख्या कमी असून, फ्लेमिंगोची प्रतीक्षा करावी लागत आहे. पट्ट कादंब (bar-headed geese), चक्रवाक आणि अन्य स्थानिक पक्ष्यांचे मात्र सहज दर्शन होत आहे. यंदाच्या दमदार आणि दिवाळीपर्यंत लांबलेल्या पावसामुळे उजनी धरण काठोकाठ भरले आहे. परिणामी पाणथळ जागा आणि त्या भोवती तयार होणारा पक्ष्यांसाठीचा अनुकूल अधिवास यंदा नाही. परिणामी फ्लेमिंगो अद्याप आलेले नाहीत. पाणी पातळी कमी झाल्यास जानेवारीअखेरपर्यंत त्यांचे आगमन होऊ शकते, अशी शक्यता पक्षीतज्ज्ञांनी वर्तविली.‘अन्नासाठी दाही दिशा, आम्हां फिरविसी जगदिशा’ या उक्तीप्रमाणे फ्लेमिंगो वर्षातून दोनदा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करतात. उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात आणि दक्षिणेकडून पुन्हा उत्तरेकडे हे पक्षी स्थलांतर करतात. या पक्ष्यांची असामान्य दृष्टी स्थलांतर करताना उपयोगी ठरते.जमिनीवरील वैशिष्ट्यपूर्ण चिन्हे दिसावीत म्हणून फ्लेमिंगो अतिउंचावर उडावे लागते. विशेषत: समुद्र ओलांडत असताना उंचीवरुन उडणे त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरते. रात्री आकाशातून प्रवास करणारे पक्षी ग्रह-नक्षत्रांचा मागोवा घेत संचार करतात, असा सिद्धांत जर्मन पक्षिशास्त्रज्ञ ई. एफ. जी. सावर यांनी मांडला आहे. पक्षी आकाशातील ग्रहगोलांना अनुसरून रात्री स्थलांतर करतात. एरवी भूतलावरील चिन्हे अंधारात दिसणे अशक्यच असते. पक्षी आपल्या इच्छित स्थानी कसे पोचतात याचा उलगडा अद्यापही नेमकेपणाने झालेला नसल्याचे निरिक्षण अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी त्यांच्या ‘पक्षीकोशा’त नमूद केले आहे. ........... ...म्हणून पक्ष्यांचे आगमन कमीयंदा पाऊस लांबला. त्यामुळे जलाशयाभोवतालची अन्नसाखळी तयार होण्यास कालावधी लागणार आहे. तापमान, वाऱ्याची दिशा आणि लहरींचे अचूक ज्ञान पक्ष्यांना असते. त्यामुळे यंदा नोव्हेंबरमध्येच तज्ज्ञांनी अंदाज वर्तविला होता की, स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबणार आहे. त्यानुसार अजूनतरी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमीच आहे.

 ............दिवसाला दोनशे ते तीनशे किमीचा प्रवासपट्ट कादंब हा दिवसाला दोनशे ते तीनशे किलोमीटर प्रवास करू शकतो आणि ताशी वेग ३५ ते ४५  किलोमीटर असते. सुमारे २७ हजार फूट उंचावरून ते उडत पुण्याकडे येतात. तिबेट, कझाकिस्तान, रशिया, मंगोलिया या  देशांमधून पट्टकादंब भारतात येतात..............बार हेडेड गूस, चक्रवाक, फ्लेमिंगो साधारणपणे ऑक्टोबर-नोंव्हेबरमध्ये पुणे परिसरात येतात. यंदा पाऊस खूप झाल्याने उजनी धरण परिसरात फ्लेमिंगो पक्षी अजून आले नाहीत. त्यांना पाणथळ (दलदल) जागा लागते. पण अजून तशी जागा भिगवणला निर्माण झालेली नाही. हवामानाचा अंदाज त्यांना असतो. पट्ट कादंब हे उडण्याची प्रचंड क्षमता असणारे पक्षी एव्हरेस्टवरून उडत येतात. त्या पर्वतावर ऑक्सिजन विरळ असतो तरी ते सहज येतात. यावरून या पक्ष्यांचे वैशिष्ट्य समजून येते.- धर्मराज पाटील, पक्षी अभ्यासक.......................आपल्याकडे येणारे फ्लेमिंगो प्रामुख्याने पर्शियातून येतात. ते स्थलांतर करण्यापुर्वी पाहणी करतात. जर तेथील वातावरण अनुकूल नसेल तर तिथे थांबत नाहीत. नंतर येतात. हे पक्षी दिवसाला १०० ते २०० किमी अंतर कापतात.- डॅा. सतीश पांडे, पक्षीतज्ज्ञ 

 

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्यRainपाऊस