शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

नाकाखाली टिच्चून 'मुक्त काश्मीर'चे फलक खपवून घ्याल का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 10:47 PM

जेएनयू हल्ल्याविरोधात आंदोलन करताना दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्या काश्मीर मुक्तीच्या फलकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.  

मुंबई : दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावरही विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला. मात्र, यावेळी आंदोलनकर्त्यांमध्ये काश्मीर मुक्त करण्याचे फलक झळकल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. 

 जेएनयू हल्ल्याविरोधात आंदोलन करताना दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्या काश्मीर मुक्तीच्या फलकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.  या आंदोलनामध्ये आयआयटी बॉम्बे, टाटा इन्स्टीट्यूटसारख्या शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी बॉलिवूडचे अभिनेते, अभिनेत्रीही सहभागी झाल्या होत्या. 

'मुक्त काश्मीर'च्या व्हिडिओवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. एएनआयचा व्हिडीओ त्यांनी रिट्विट करत उद्धव ठाकरेंना जाब विचारला आहे. आंदोलन नेमके कशासाठी? काश्मीर मुक्तीची घोषणा कशाला? मुंबईमध्ये अशाप्रकारचे फुटीरतावादी खपवून का घ्यायचे? हे फक्त मुख्यमंत्रू कार्यालयापासून दोन किमीवर घडतेय? उद्धव ठाकरे, तुमच्या नाकाखाली टिच्चून मुक्त काश्मीरचा भारतविरोधी राग आळवला जातोय, तो खपवून घेणार का, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. 

जेएनयूमध्ये रविवारी सायंकाळी मास्कधारक हल्लेखोरांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह 30 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांना गंभीर मारहाण करण्यात आली. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच काही जणांची ओळख पटविल्याचे समजत आहे.

टॅग्स :jnu attackजेएनयूUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी