शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
3
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
4
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
5
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
6
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
7
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
8
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
9
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
10
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
11
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
12
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
13
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
14
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
15
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
16
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
17
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
18
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
19
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
20
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

आता सरकार पडण्याची हिंमत दाखवून पाहा, उद्धव ठाकरेंचे भाजपाला थेट आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 18:20 IST

भाजपाशी युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. मात्र विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाकडून हे सरकार पाडण्यासाठी येनकेन प्रकारे प्रयत्न सुरू आहेत.

जळगाव - मुख्यमंत्रिपदावरून वाद होऊन युती तुटल्यापासून एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा हे आता एकमेकांचे हाडवैरी झाले आहेत. भाजपाशी युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. मात्र विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाकडून हे सरकार पाडण्यासाठी येनकेन प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाला उद्धव ठाकरे यांनी आज थेट आव्हान दिले आहे. मुक्ताईनगर येथे उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे भाजपाला उद्देशून म्हणाले की, ''ऑपरेशन लोटस ने तुम्हाला लोटलं, आता सरकार पडण्याची हिम्मत दाखवून पाहा.'' दरम्यान,  २५ वर्षे ज्यांच्या सोबत होतो त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. आपण मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी का स्वीकारली याचाही उलगडा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ''उद्धव हे तू करणार नसशील तर हे होणारच नाही असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले.  दरम्यान, २ लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा निर्णय ही माझ्या कारकिर्दीची सुरुवात होती. आता २ लाखाच्यावर कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच निर्णय घेणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे  - मुक्ताईनगर आज मुक्त झाले कशा पासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक आहे- उद्धव हे तू करणार नसेल तर हे होणारच नाही असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली-  २५ वर्ष ज्यांच्या सोबत होतो त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला- आता २ लाखाच्यावर कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणा-यांसाठी लवकरच निर्णय घेणार- ऑपरेशन लोटस ने तुम्हाला लोटलं आता सरकार पडण्याची हिम्मत दाखवून पाहा-  शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातुन मुक्त करीत शेतात दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे वचन देतो-   प्रशासन मला कळत नाही अशी विरोधक टिका करतात. त्याचा फार फरक पडत नाही. जनतेची काम झाली आणि होत आहे हे महत्त्वाचे

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाJalgaonजळगाव