शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; भाजपचे माजी मंत्री संजय देशमुख यांनी बांधले शिवबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:38 IST

संजय देशमुख ठाकरे गटात गेल्यामुळे शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना तगडे आव्हान मिळणार आहे.

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. 40 आमदार आणि 12 खासदारांसह अनेक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. यातच पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठीउद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे. संजय राठोड यांच्या मतदार संघातील माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते संजय देशमुख (Sanjay Deshmukh)यांचा आज मातोश्रीवर शिवबंधन बांधून पक्षप्रवेश झाला आहे. 

डिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेते प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांना शिवबंधन बांधले. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत मागील महिन्यात अकोला येथे आले असता देशमुख यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली होती. तेव्हापासूनच देशमुख हे उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेण्याची शक्यता वर्तविली जात होती. दिग्रसमध्ये संजय राठोड आणि संजय देशमुख मोठे नेते आहेत. संजय देशमुखांना मात दिल्यामुळे सध्या मतदारसंघात संजय राठोड यांचे दिग्रस वर्चस्व आहे. आता संजय देशमुख शिवसेनेत आल्यामुळे दिग्रस मतदारसंघात राठोड विरुद्ध देशमुख अशी लढत पाहायला मिळणार आहे. संजय राठोड यांना आव्हान देण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत संजय देशमुख?संजय देशमुख आणि संजय राठोड यांची सुरुवात शिवसेनेतूनच झाली. पण, कालांतराने दोघे वेगवेगळ्या पक्षात गेले. देशमुख यांनी 1999 ते 2009 असे दहा वर्षे दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. दिग्रसमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे. 1999 मध्ये शिवसेनेत असताना विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांनी 125 मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव करून विधिमंडळात प्रवेश केला.

त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र भाजप-सेना युतीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी संजय राठोड यांच्याविरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी केली. त्यावेळी त्यांना 75 हजारांवर मते मिळाली होती. मतदारसंघातील विविध संस्थांवर देशमुख यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या प्रवेशानंतर मतदारसंघातील गणिते बदलण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरे