शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे भाजपला तगडा झटका देणार; नाराज खासदार राऊतांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:28 IST

Unmesh Patil Meet Sanjay Raut: ठाकरे गटाने अद्याप जळगावचा उमेदवार जाहीर केलेला नाहीय. यामुळे भाजपच्या नाराज खासदाराने संजय राऊतांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे.

लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले भाजपा खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पाटील हे मुंबईत संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. यामुळे ठाकरे गट भाजपालाजळगावमध्ये तगडा झटका देण्याच्या तयारीत आहे. 

उन्मेष पाटील हे जळगावचे खासदार आहेत. यावेळी भाजपाने पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांना भाजपातून अंतर्गत विरोध होता. तर महाविकास आघाडीमध्ये जळगावची जागा ठाकरे गटाकडे आली आहे. ठाकरे शिवसेनेकडून डॉ. हर्षल माने आणि माजी नगराध्यक्ष कुलभूषण पाटील हे इच्छुक आहेत. 

ठाकरे गटाने अद्याप जळगावचा उमेदवार जाहीर केलेला नाहीय. यामुळे उन्मेष पाटील आणि राऊतांची भेट महत्वाची मानली जात आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील नाराज होते. ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

2019 मध्ये काय झालेले...जळगाव मतदार संघातून भाजपचे आमदार असलेले उन्मेष पाटील हे ४ लाख ११ हजार ६१७ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. पाटील यांना ७ लाख १३ हजार ८७४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना ३ लाख २,२५७ मते मिळाली होती. राजकारणाचा कोणताही पुवार्नुभव नसताना वयाच्या ३६व्या वर्षी उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव विधानसभेची निवडणुक जिंकली होती. यानंतर ते खासदार झाले होते. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतjalgaon-pcजळगावBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४