शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणार; काय म्हणाले संजय राऊत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 13:58 IST

मी पुस्तक पूर्ण वाचले नाही. आत्मचरित्रात अनेक गोष्टी येत असतात. त्या व्यक्तिगत भूमिका असतात असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकातून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दोनदा जाणे हे पचनी पडणारे नव्हते असं शरद पवारांनी पुस्तकात लिहिलं आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे या सर्व प्रश्नांवर आणि शंकावर सडेतोड उत्तर देतील. सामनातून त्यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होईल असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, मी पुस्तक पूर्ण वाचले नाही. आत्मचरित्रात अनेक गोष्टी येत असतात. त्या व्यक्तिगत भूमिका असतात. लोकांच्या भूमिका नसतात. या विषयावर माझे उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. लवकरच या सर्व घडामोडींवर सामनातून प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होतेय. तुम्हाला या सर्व प्रश्नांची किंवा शंका उत्पन्न झालेत त्यावर सडेतोड उत्तरे मिळतील असं त्यांनी सांगितले आहे. 

तसेच एका अनेक वर्ष राजकीय प्रवास, संघर्ष केलेल्या नेत्याची ती आत्मकथा आहे. त्यात काही आक्षेपार्ह असेल तर जे लोक असतील ते उत्तर देतील. प्रत्येकाची वेगळी बाजू आणि भूमिका असते. ती बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. शरद पवारांबाबत ज्या भूमिका आहेत ती उद्धव ठाकरे मुलाखतीतून मांडणार आहेत. त्यात सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळतील. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या मनातील अस्वस्थता जाणवत होती. भाकरी फिरवण्याची वेळ आलीय हे त्यांनी विधान केले. पण त्यांनी तवाच फिरवला असंही संजय राऊत यांनी म्हटलं. 

मंत्रालयात न जाण्यावरून पवार ठाकरेंवर नाराजउद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावर शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात भाष्य केले आहे. विशेषतः उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयात न जाण्यावर पवारांची नाराजी होती, हे या पुस्तकातून समोर आले आहे. याबाबत पवारांनी लिहिले आहे की, उद्भवना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते. बाळासाहेबांसमवेतची संवादातील सहजता उद्भवशी बोलताना नव्हती. राज्याच्या प्रमुखाला उद्या काय होऊ शकेल त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत, हे ठरवण्याचे राजकीय चातुर्य हवे. याची कमतरता जाणवत होती. हे टाळता आले असते असं शरद पवारांनी म्हटलं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत