शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Uddhav Thackeray: "आम्ही भाजपला सोडलं, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 19:43 IST

Uddhav Thackeray Kolhapur: "2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती, भाजपसारखी आम्ही छुपी युती करत नाही. शिवसेना समोरुन वार करते, पाठित वार करण्याची आमची परंपरा नाही."

कोल्हापूर:कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Byelection) सर्व पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांच्यासाठी कोल्हापूरात येऊन प्रचार केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

'भाजप म्हणजे हिंदुत्व नाही...'आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित केले. "आम्ही कमी पडलो तरी चालेल, पण खोटं कधीच बोलणार नाही. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपवाले म्हणतात की, शिवसेनेने हिंदुत्व सोडले, पण आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही," अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष टोला"भाजपने देशात एक बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. भाजपला खरचं हिंदुहृदयसम्राटांबद्दल प्रेम असेल, तर मग अमित शहांनी दिलेला शब्द का मोडला? नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचा नाव देण्यास भाजपचा विरोध आहे. भाजपच्या झेंड्यावरही अटलजी, अडवाणींचा फोटो नसतो. भाजपकडून पंतप्रधानपदासापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातो, त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही, " असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.

'आम्ही पाठित वार करत नाही'ते पुढे म्हणाले की, "कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून येणारच. मर्दाने मर्दासारखे लढलं पाहिजे, ते कोल्हापूरकरांकडून शिकलं पाहिजे. काल फडणवीस येऊन गेले, भाजपकडे स्वतःच्या कर्तृत्वाचे काही सांगण्यासारखे नाही मग धार्मिक मुद्द्यांव पुढे केले जातात. 2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती की नाही?, भाजपसारखी आम्ही छुपी युती करत नाही. शिवसेना समोरुन वार करते, पाठित वार करण्याची आमची परंपरा नाही," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक