Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: सुनावणी एवढी रंगली की तहानभूक विसरले; खंडपीठाने लंच ब्रेक पुढे ढकलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:29 IST2023-02-16T13:28:26+5:302023-02-16T13:29:19+5:30
थोड्याच वेळात निकाल येणार? एवढे दिवस नुसती सुनावणी पुढे ढकलणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: सुनावणी एवढी रंगली की तहानभूक विसरले; खंडपीठाने लंच ब्रेक पुढे ढकलला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडेच ठेवायचे की ७ जणांच्या खंडपीठाकडे सोपवायचे यावर आज निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. एवढे दिवस नुसती सुनावणी पुढे ढकलणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. दोन्ही बाजुंकडून युक्तीवाद-प्रतिवाद करण्यात येत आहे. हे एवढे रंगले आहेत, की उपस्थित सारेच तहानभूक विसरल्याचे चित्र आहे.
बुद्धिबळाच्या खेळासारखं शिंदे गट खेळला, सरन्यायाधीशांचं मोठं विधान; सिब्बल म्हणाले, पाया पडतो पण...
सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी पुढे सुरु ठेवण्यासाठी लंच ब्रेक पुढे ढकलला आहे. अभिषेक मनु संघवी यांचा प्रतिवाद सुरु झाला आहे. संघवी यांनी ठाकरे गटाकडून प्रतिवादाला सुरुवात केली आहे. नबाम रेबिया प्रकरणानुसार निर्णय होऊ नये असे विरोधक म्हणत आहेत. परंतू तेच युक्तीवादात याचे दाखले देत आहेत, असे पलटवार संघवी यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे. यामुळे सरन्यायाधीशांनी युक्तीवाद संपविण्यासाठी लंच ब्रेक पुढे ढकलला आहे. सुनावणी संपल्यानंतर लंच ब्रेक घेऊन यानंतर निर्णय देण्याची शक्यता आहे.
आज काय काय घडले...
"घटनेच्या १० व्या सूचीचा आधार घेऊन सरकार पाडण्यासाठी मार्ग तयार करुन देऊ नका. हे प्रकरण फक्त सध्यापुरतं मर्यादित नाही. यापुढील काळातही अशी प्रकरणं उद्भवू शकतात आणि १० व्या सूचीच्या आधारे देशातील सरकारं पाडू देऊ नका. हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होईल. निवडून आलेली सरकारे पाडली जातील. कोणत्याही लोकशाहीला ते परवडणारे नाही. त्यामुळे कृपया हे प्रकरण फक्त चर्चेचा विषय आहे असं म्हणू नका. मी तुमच्या पाया पडतो. दहाव्या सूचीच्या आधारावर सरकार पाडू देऊ नका", असा जोरदार युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे आणि दोन्ही पक्षाकडून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जोरदार युक्तीवाद सुरू आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत असताना सरन्यायाधीशांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. शिंदे गटाकडून बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे पुढची खेळी ओळखली गेली. पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहित होतं, असं विधान सरन्यायाधीशांनी केलं आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरन्यायाधीशांनी वरील विधान केलं आहे.