उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नावाला कलंक; रवी राणांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 17:08 IST2023-07-11T17:01:48+5:302023-07-11T17:08:28+5:30
आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव उंच करण्याऐवजी खाली आणायचे काम उद्धव ठाकरेंनी केल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नावाला कलंक; रवी राणांची टीका
नागपुरच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरउद्धव ठाकरेंनी नागपुरला लागलेला कलंक असल्याचे म्हटले होते. यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीसांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. आता फडणवीसांचे समर्थकही ठाकरेंवर टीका करत आहेत.
आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव उंच करण्याऐवजी खाली आणायचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. उद्धव ठाकरेच बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला कलंक आहेत असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी लोकांना उपेक्षित ठेवून महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम केले. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना 10 वेळा विचार केला पाहिजे, असा इशारा राणा यांनी दिला.