शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

Uddhav Thackeray Devendra Fadnavis: "मी देवेंद्र फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंचे उपमुख्यमंत्र्यांना 'चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 11:49 IST

Uddhav Thackeray Challenge Devendra Fadnavis: राहुल गांधी यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती. त्या टीकेला उद्धव ठाकरेंनी टोला लगावता प्रत्युत्तर दिले.

Uddhav Thackeray Challenge Devendra Fadnavis: राज्यात सध्या लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचा माहोल आहे. प्रत्येक पक्ष प्रचारात आपली कशी सरशी होइल याकडे लक्ष देताना दिसतोय. त्यामुळेच प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर आरोप करणे किंवा त्यांना टोलेबाजी करण्यात कोणीही मागे पडताना दिसत नाही. नुकताच स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट प्रदर्शित झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवासांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर राहुल गांधी टोला लगावला होता. 'सावरकरांवर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी हा चित्रपट पाहावा, त्यांच्यासाठी थिएटर बूक करण्याचा खर्च मी करतो', असा खोचक टोला त्यांनी लगावला होता. त्याबाबत प्रश्न विचारताच, शिवसेना उबाठा पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांनी टोला लगावला.

"मी देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण जाण्याचा येण्याचा खर्च करतो, त्यांचा हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावे. त्यांनी लडाखमध्येही जाऊन यावे. मी खर्च करायला तयार आहे. दार्जिलिंगमध्ये एका व्यक्तीला दिलेली वचनं कशी मोडली ते भेटून माहिती घ्यावी. अरूणाचलमध्ये जाऊन यावं. त्यांच्या जाण्या-येण्याचा आणि राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे. काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं. बॉलीवुडची मंडळी आता राजकारणात येत आहेत. तर एखाद्या निर्मात्याला सोबत घेऊन फडणवीसांनी मणिपूर फाइल्स हा चित्रपट काढावा," अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर