शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

"तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक"; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 14:36 IST

उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री' वर पत्रकार परिषदेत डागली तोफ

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यात पडलेला दुष्काळ आणि आता अवेळी होणारा पाऊस यामुळे शेतीचे आणि बळीराजाचे मोठे नुकसान होत आहे. या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश जिल्हास्तरावर घेण्यात आले आहेत. मात्र दुष्काळी भागात पंचनामे होऊन बरेच ठिकाणी आर्थिक मदत मिळालेली नसल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी राजस्थान आणि तेलंगणामध्ये प्रचारासाठी गेलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरेंनी जहरी टीका केली.

"माझ्या राज्यातील शेतकरी विविध समस्यांशी झुंजत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर अस्मानी संकटांच्या तडाख्याने शेतकरी त्रस्त आहे. असे असताना जो माणूस स्वत:च्या घराची (राज्यातील समस्यांची) काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जात असेल तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा किंवा मी राज्याचा महत्त्वाचा भाग आहे हे बोलण्याचा अधिकार नाही", अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

"अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. कांद्याचे आणि द्राक्षाचे नुकसान झाले आहे. मात्र आजचे मुख्यमंत्री स्वच घर सोडून दुसऱ्याचे घर धुंडाळत आहेत. दुसऱ्यांचे घर धुंडाळणारे हे भुरटे शेतकऱ्यांना काय न्याय देणार? शेतीमध्ये मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने जातात. इतर शेतकऱ्यांचीही तेवढीच प्रगती झाली पाहिजे असे माझे मत आहे. भाजप सध्या प्रचारांमधून रेवड्या उडवत आहेत. इतर राज्यांवर रेवड्या वाटणारे महाराष्ट्राला कधी देणार?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा मिळाला नाही? पीकविम्यावरुन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री