उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा फुगा आता फुटलेला आहे. भाषिक प्रांतावादाचं विष भाजपा पसरवत आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. "रोजच प्रवेश होत आहेत. मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जातो आहे पण ही नुसती गर्दी नाही तर लढणाऱ्या शिवसैनिकांचे हे सैन्य आहे."
"आपल्यातना जे गेले होते ते परत आले आहेत. हळूहळू सगळ्यांना लक्षात यायला लागलं आहे की, भाजपा आणि गद्दार किती ढोंगी आहेत. पण ही लढाई सोपी नाही. जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा. भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. भाजपाने जसे पक्ष फोडले तसे आता ते घरं देखील फोडायला बघत आहेत. भाजपाचा हिंदुत्वाचा फुगा आता फुटलेला आहे."
"पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं त्यावेळी ज्यांच्यावर भाजपाने आरोप केले होते, त्यांनाच भाजपाने दोन दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश दिला. त्यांना वाटलं की हे पाप लपलं जाईल. पण ते चव्हाट्यावर आल्यावर त्यांनी त्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली. आता हे लोकं भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले आहे. भाषेवरून कुणाचे खून करा, मारा अशी आपली भूमिका नाही."
"कोणत्याही भाषिकाने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये. हा भाषिक प्रांतवाद पण यांनी सुरू केला. मागाठाणे मधला मराठी माझी आई आहे आणि आई मेली तरी चालेल असं बोलतो त्याचं काय करायचं. घाटकोपरमध्ये संघाचे जोशी बोलतात माझी मातृभाषा गुजराती. हे भाषिक प्रांतावादाचं विष भाजपा पसरवतंय. तोडा, फोडा आणि राज्य करा हे पसरवत आहेत. आपल्याला आपल्या राज्याला, भूमीपुत्रांना सांभाळायचंय आणि तुम्हाला खात्री पटली आहे की हे काम शिवसेनाच करू शकते" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
Web Summary : Uddhav Thackeray strongly criticized BJP, accusing it of deceitful politics, spreading linguistic divisions, and attempting to break homes. He highlighted BJP's hypocrisy and asserted Shiv Sena's commitment to protecting the state and its people.
Web Summary : उद्धव ठाकरे ने भाजपा की कड़ी आलोचना करते हुए उस पर धोखेबाज राजनीति करने, भाषाई विभाजन फैलाने और घरों को तोड़ने की कोशिश करने का आरोप लगाया। उन्होंने भाजपा के पाखंड पर प्रकाश डाला और राज्य और उसके लोगों की रक्षा के लिए शिवसेना की प्रतिबद्धता पर जोर दिया।