शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

उद्धव ठाकरेंनी दाखवली महायुतीची 'ती' जाहिरात, अर्थसंकल्पानंतर काय काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:29 IST

Uddhav Thackeray Maharashtra Budget 2025 News: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महायुतीला जुन्या घोषणांची आठवण करून दिली.

Uddhav Thackeray Maharashtra Budget News: 'तिजोरीमध्ये पैसा नाहीये आणि यांच्या संकल्पालाही काही अर्थ नाहीये. आचार्य अत्रे असते, तर ते असं म्हणाले असते की, गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नाही', असे म्हणत शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. यावेळी ठाकरेंनी महायुतीची विधानसभा निवडणुकीवेळची जाहिरात दाखवत, 'मारल्या थापा भारी अन् महाराष्ट्र केला कर्जबाजारी', अशा शब्दात डिवचलं.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. महायुतीने विधानसभा निवडणुकीवेळी केलेल्या घोषणांची जाहिरात ठाकरेंनी दाखवली. 

'काम केलंय भारी नाही, मारल्या थापा भारी', ठाकरे काय बोलले?

उद्धव ठाकरे म्हणाले, "निवडणूक लढवताना काही घोषणा केल्या होत्या. त्याची जाहिरात घेऊन मी आलोय. या जाहिरातींसाठी लाखो रुपयांची उधळण केली गेली. खाली एक वाक्य आहे. हे वाक्य आता बदलायला पाहिजे. 'केलंय काम भारी', आता हे वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी. अशी आताची परिस्थिती आहे", असे टीका ठाकरेंनी केली. 

'बहुमताचा अपमान करणार अर्थसंकल्प'

"हा जो त्यांचा विजय आहे, निवडणुकांमधला; आमच्या मते बोगस मतदान, ईव्हीएमचा घोटाळा, दुबार मतदान यांचा परिपाक आहे. पण, सरकारला जर वाटतंय की महाराष्ट्रातील जनतेनं बहुमताने निवडून दिलंय. त्या बहुमताचा अपमान करणारा हा अर्थसंकल्प आहे. कारण लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देणार होते, त्याचा उल्लेख नाहीये", असे ठाकरे अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले.

"मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरच्या अधिवेशनात कर्जमुक्तीची घोषणा करून अमलबजावणी केली होती. लाडक्या बहि‍णींबद्दलचं यांचं प्रेम दिसलं नाही, पण कंत्राटदारांबद्दलचं प्रेम कायम आहे. लाडक्या कंत्राटदारांसाठी हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारा पोकळ असा अर्थसंकल्प आहे", अशी टीका ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार