उद्धव ठाकरेंचा सपत्नीक वंदे भारतने प्रवास; भाजप, शिंदे समर्थकांविरोधातला कोकण दौरा आटोपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 22:05 IST2024-02-05T22:04:55+5:302024-02-05T22:05:39+5:30

दोघांचेही एक्झिक्युटीव्ह क्लासमधील फोटो व्हायरल झाले आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या सोबत गेलेले शिवसेनेचे आमदार, भाजपाचे नारायण राणे आदींविरोधात टीका केली होती.

Uddhav Thackeray, Rashmi Thackeray travels through Vande Bharat Exprress; The Konkan tour against BJP, Shinde supporters is over, photoes viral | उद्धव ठाकरेंचा सपत्नीक वंदे भारतने प्रवास; भाजप, शिंदे समर्थकांविरोधातला कोकण दौरा आटोपला

उद्धव ठाकरेंचा सपत्नीक वंदे भारतने प्रवास; भाजप, शिंदे समर्थकांविरोधातला कोकण दौरा आटोपला

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर भाजप, मोदी-शाह आणि शिंदे यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात टीकेची राळ उडविली होती. रायगडातून सुरु झालेला दौरा पार तळकोकणात सावंतवाडीपर्यंत झाला होता. येताना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी वंदे भारतने प्रवास केला आहे. 

दोघांचेही एक्झिक्युटीव्ह क्लासमधील फोटो व्हायरल झाले आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या सोबत गेलेले शिवसेनेचे आमदार, भाजपाचे नारायण राणे आदींविरोधात टीका केली होती. आजही उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीत सभा घेत मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. हा दौरा आटोपून उद्धव ठाकरे यांनी चिपळून रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे वंदे भारत एक्स्प्रेसने प्रयाण केले. 

रत्नागिरीत काय म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत आपली रत्नागिरीची जागा कायम राहिलीच पाहिजे आणि त्यानंतरच्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवायला हवाय. गद्दारांचे डिपॉझिट असे जप्त करा की पुन्हा कोणी रत्नागिरीमधून गद्दारीतील ‘ग’सुद्धा उच्चारणार नाही, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
 

Web Title: Uddhav Thackeray, Rashmi Thackeray travels through Vande Bharat Exprress; The Konkan tour against BJP, Shinde supporters is over, photoes viral