शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

Uddhav Thackeray PC: हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही; पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:20 IST

ज्याप्रकारे हे सरकार स्थापन झाले. तथाकथित मुख्यमंत्री केला. हेच मी अडीच वर्षापूर्वी सांगत होतो असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

 मुंबई - सत्ता येते-जाते परत येते, परंतु लोकांच्या अश्रूची प्रतारणा केली नाही. विचित्रपणाने शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्रिपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होणं हे जनतेला आवडेल न आवडेल माहिती नाही परंतु हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. तो धृतराष्ट्रासारखा नाही. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याप्रकारे हे सरकार स्थापन झाले. तथाकथित मुख्यमंत्री केला. हेच मी अडीच वर्षापूर्वी सांगत होतो. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा काळ वाटून घ्यावा हेच अमित शाहांशी बोलणं झाले होते. मग त्यावेळेला नकार देऊन आत्ताच हे का घडलं? लोकसभेला, विधानसभेला आपण एकत्र होतो. आधीच हे घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता असं त्यांनी सांगितले. 

लोकशाही धोक्यात  लोकशाहीचे चार स्तंभ असतात, या चारही स्तंभाने लोकशाही वाचवायला पुढे यायला पाहिजे. लोकशाही उरली नाही तर या स्तंभाला काहीही अर्थ राहणार नाही. आपल्याकडे गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. ज्याने मतदान केले त्याला कळायला हवं कुणाला मतदान हवं. आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. निवडून आलेल्या प्रतिनिधीला बोलावण्याचा अधिकार हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. माहिमच्या मतदाराने टाकलेले मत व्हाया सूरत, व्हाया गुवाहाटी गोवा फिरत असेल तर लोकशाही आहे कुठे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मातोश्रीत दिलेला शब्द पाळला असता तर...लोकशाहीत सर्वोच्च मतदार असतो. त्याचा बाजार अशाप्रकारे मांडलेला असतो ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे. मातोश्रीत दिलेला शब्द पाळला असता तर आत्ताचे सरकार शानदारपणे झाले असते. माझ्या पाठित सुरा खुपसला तो मुंबईकरांच्या पाठित खुपसू नका. मला दिलेला शब्द पाळला असता तर अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता, यात भाजपाच्या मतदारांना काय मिळालं हे कळत नाही असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. 

माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नकातसेच माझ्यावर राग आहे, पण त्याचा राग मुंबईवर काढू नका. एका रात्रीत आरेतील कारशेडबाबत निर्णय बदलण्यात आला. मी विकासाच्या आड येत नाही. मी पर्यावरणवादीच्या सोबत आहे. संभ्रम होतो ती गोष्ट टाळलेली बरी. माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. अहंकार नाही. आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून मुंबईच्या पर्यावरणाला हानी पोहचेल, आज आरेचा भाग घेतल्यानंतर त्याच्या आजूबाजूला खासगी विकासक येतील, वन्यजीव धोक्यात येईल, कांजूरची जमीन महाराष्ट्राच्या हितासाठी वापरा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा