शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 3:38 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी या भेटीच्या वृत्ताल दुजोरा दिला असून, गोपनियरीत्या झालेल्या भेटीमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी या भेटीच्या वृत्ताल दुजोरा दिला असून, दहा दिवसांपूर्वी घेतलेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील राजकारणातील सद्यस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच सत्तेत राहायचे की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी विचारविमर्श केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांच राज्याच्या राजकारणात नवी राजकीय गणिते समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली. या भेटीमध्ये ठाकरे यांनी भाजपा सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नसल्याचे दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर तुमचा निर्णय तुम्ही घ्या, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका ठरवेल, असे शरद पवारांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणाऱ्या नारायण राणे यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे अनेक नेते राणे यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास इच्छुक आहेत. राणेंना मंत्रिमंडळात घेऊन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यामुळे भाजपाच्या प्रभावातून बाहेर पडून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी कट्टर भाजपा विरोधक असलेल्या तृणमुल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीगाठींमधून भाजपाला स्पष्ट संकेत देण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना