शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: 'अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, पाठित वार केला', उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:27 IST

Uddhav Thackeray: 'काल जे सरकार स्थापन झालं, तेच मी अडीच वर्षांपूर्वी मागितलं होतं. शब्द पाळला असता तर कालचा कार्यक्रम सन्मानाने झाला असता.'

मुंबई: काल(दि.30 जून) शिवसेनेचे बंडकोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला केला. यावेळी त्यांनी परत एकदा अडीच वर्षांपूर्वीच्या अमित शहांच्या शब्दाची आठवण करुन दिली.

'हेच मी मागितलं होतं'

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''सर्वप्रथम मी नवीन सरकारचे अभिनंदन करतो. सरकारकडून महाराष्ट्राचं भलं व्हावं, हीच त्यांच्याकडे अपेक्षा. माझ्यासमोर काही प्रश्न पडले. ज्यापद्धतीने हे सरकार स्थापन झालं, त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री केलां. हेच मी अडीच वर्षांपूर्वी मागितलं होतं. तसं झालं असतं तर आज अडीच वर्षे झालीच आहेत, कालचा कार्यक्रम सन्मानाने झाला असता.''

'तेव्हा पाठीत वार केला...'

''तेव्हा नकार देऊन आता भाजपने असं का केलं? शिवसेना तुमच्यासोबत होतीच ना. लोकसभा आणि विधानसभेतही तुमच्यासोबत होती. निवडणुकीच्या आधी हेच ठरलं होतं. मला कशाला मुख्यमंत्री बनवायला लावलं. अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, माझ्या पाठीत वार केला. हे म्हणत आहेत की, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. पण, तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेलाच नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून मुख्यमंत्री होऊ शकत नाही.''

'अमित शहांनी शब्द मोडला'

''तेव्हा अमित शहांनी दिलेला शब्त पाळला असता, तर किमान अडीच वर्षे भाजपचा मुख्यंत्री झाला असता. आता पाचही वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. आम्हीही तेव्हा माझ्या स्वाक्षरीचा करार करुन तो मंत्रालयात लावला असता. म्हणजे, तो सगळ्यांना दिसला असता. पण, त्यांनी शब्द पाळला नाही, पाठित खंजीर खुपसले,'' असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकशाही धोक्यात  ''लोकशाहीचे चार स्तंभ असतात, या चारही स्तंभाने लोकशाही वाचवायला पुढे यायला पाहिजे. लोकशाही उरली नाही तर या स्तंभाला काहीही अर्थ राहणार नाही. आपल्याकडे गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. ज्याने मतदान केले त्याला कळायला हवं कुणाला मतदान हवं. आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. निवडून आलेल्या प्रतिनिधीला बोलावण्याचा अधिकार हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. माहिमच्या मतदाराने टाकलेले मत व्हाया सूरत, व्हाया गुवाहाटी गोवा फिरत असेल तर लोकशाही आहे कुठे?'' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाह