Uddhav Thackeray Interview : शिवसेनेच्या बाबतीत विश्वासघाताचं राजकारण का होतं?; उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही प्रोफेशनली…”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 08:45 AM2022-07-26T08:45:01+5:302022-07-26T08:45:01+5:30

ता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. २०१४ साली भाजपने युती तोडली होती तेव्हा आपण काय सोडलं होतं?, उद्धव ठाकरे यांचा सवाल.

Uddhav Thackeray Interview Why is there politics of betrayal in the case of Shiv Sena Uddhav Thackeray answered saamana sanjay raut interview maharashtra political crisis | Uddhav Thackeray Interview : शिवसेनेच्या बाबतीत विश्वासघाताचं राजकारण का होतं?; उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही प्रोफेशनली…”

Uddhav Thackeray Interview : शिवसेनेच्या बाबतीत विश्वासघाताचं राजकारण का होतं?; उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही प्रोफेशनली…”

googlenewsNext

‘‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले,” असे भावनिक उद्गार माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या बाबतीत विश्वासघाताचं राजकारण वारंवार का होतं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आम्ही पक्ष प्रोफेशनली चालवत नसल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमत्रिपदाची शपथ घेतली.

“आम्ही पक्ष ‘प्रोफेशनली’ चालवत नाही. आपण पक्षाकडे एक परिवार म्हणून बघत आलोय. बाळासाहेबांनी आपल्याला तेच शिकवलंय. आपलं म्हटल्यावर आपलं असं माँ नीदेखील शिकवलं आहे. कदाचित राजकारणामधला गुन्हा किंवा चूक असेल ती आमच्याकडून वारंवार होते.  एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही त्याच्यावर अंधविश्वास टाकतो. पूर्ण जबाबदारीने त्याला ताकद देणं असेल, शक्ती देणं असेल आम्ही ते करतो. पण आता ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

… तेव्हा काय सोडलं होतं?
“आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. २०१४ साली भाजपने युती तोडली होती तेव्हा आपण काय सोडलं होतं? हा प्रश्न आता मला त्यांना विचारायचा आहे. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. जेव्हा शिवसेना विरोधी पक्षात बसली होती तेव्हा अनेकांना शिवसेना संपेल असं वाटलं होतं. पण त्या वेळी शिवसेना एकाकी लढली आणि ६३ आमदार निवडून आले. त्या काळात विरोधी पक्षाचीही जबाबदारी आपल्यावर आली होती, तेव्हा मी पद कुणाला दिलं होतं? भाजपने आता जे केलंय हे माझ्याशी बोलणी केल्याप्रमाणे तेव्हा केलं असतं तर सगळं काही सन्मानाने झालं असतं. देशभरात ‘पर्यटन’ करण्याची गरज भासली नसती आणि असं मी ऐकलंय, असं मी वाचलंय, माझ्याकडे पक्की माहिती नाही, पण हजारो कोटी रुपये यावर खर्च केले गेले. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, त्यानंतर काही आणखी अतिरिक्त खर्च,” असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा -
बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही इतके ‘रिलॅक्स’ कसे? उद्धव ठाकरेंनी सांगितलं सिक्रेट! 

माझी हालचाल बंद असताना यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या; मानेतील क्रॅम्पनंतर काय-काय घडलं

Web Title: Uddhav Thackeray Interview Why is there politics of betrayal in the case of Shiv Sena Uddhav Thackeray answered saamana sanjay raut interview maharashtra political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.