शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या कृषी कायद्यांवर राज्याची कुरघोडी, तीन विधेयके मांडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 10:04 IST

या विधेयकावर कृषिमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत आक्रमक भाषणे करत केंद्राच्या कायद्यावर टीका केली. विधानसभेत भुजबळ यांनी जीवनावश्यक वस्तू सुधारणा अधिनियम २०२१ हे विधेयक सादर केले.

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या नाही तर फक्त मूठभर उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, असे सांगत राज्य सरकारने या कायद्यांमध्ये सुधारणा करणारी तीन विधेयके विधानसभेत सादर केली. केंद्राने कायदे करताना शेतकऱ्यांना विचारलेदेखील नाही. मात्र, आम्ही असे करणार नाही. ही तिन्ही विधेयके जनता, शेतकरी व सामाजिक संस्था, संघटनांना देऊ. त्यांच्याकडून सूचना व हरकती मागवू, असेही सरकारने सांगितले.या विधेयकांचा मसुदा जनतेच्या व शेतकऱ्यांच्या विचारार्थ ठेवण्यात येणार असून दोन महिने त्यावर शेतकरी आणि सामाजिक संस्था आणि संघटनाच्या सूचना विचारात घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, अशी घोषणाही थोरात यांनी केली.या विधेयकावर कृषिमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत आक्रमक भाषणे करत केंद्राच्या कायद्यावर टीका केली. विधानसभेत भुजबळ यांनी जीवनावश्यक वस्तू सुधारणा अधिनियम २०२१ हे विधेयक सादर केले. तर शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण आश्वासित किंमत आणि शेतीसेवा विषयक करार महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२१) कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आणि शेतकरी उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रोत्साहन आणि सुविधा) अधिनियम २०२० हे विधेयक सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सादर केले.शेतकरी उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रोत्साहन आणि सुविधा) महाराष्ट्र सुधारणा अधिनियममधील प्रमुख प्रस्तावित तरतुदीमध्ये, राज्यात कोठेही शेतमालाचा व्यापार करण्यासाठी किंवा शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडून परवाना घेणे बंधनकारक असेल. व्यापारी परवानाधारक असल्यामुळे सक्षम प्राधिकरणासमोर दाद मागता येईल. शेतकरी उपलब्ध कायदेशीर पयार्यांचा अवलंब देखील करू शकतात. 

कृषी कायद्यातील बदल किरकोळ - फडणवीसकेंद्राच्या कृषि कायद्यांसंदर्भात राज्य सरकारने सुचविलेले बदल हे अतिशय किरकोळ स्वरूपाचे आहेत. आता त्यावर पुढच्या दोन महिन्यांत अभिप्राय मागण्यात येणार आहेत. ते बदल जर केंद्र सरकारने आधीच मान्य केले तर मग या कायद्यांची इतके दिवस अडवणूक आणि त्याविरोधात भ्रामक प्रचार का?     - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

काय आहेत नव्या विधेयकातील तरतुदी- शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण आश्वासित किंमत आणि शेतीसेवा विषयक करार महाराष्ट्र सुधारणा विधेयक) प्रस्तावित विधेयकात प्रमुख तरतुदींमध्ये व्यवहाराची किंमत किमान आधारभूत किमतीइतकी किंवा त्यापेक्षा जास्त असल्याशिवाय शेतमालाच्या खरेदी-विक्रीचा कुठलाही करार किंवा व्यवहार हा कायदेशीर नसेल. - शेतकरी व करार करणारा यांच्यातील वाद सोडविण्यासाठी ते सक्षम प्राधिकरण किंवा अधिकाऱ्याकडे तसेच संस्थेकडे जाऊ शकतात. हा वाद ३० दिवसांच्या आत सोडवणे बंधनकारक राहील. जर विवादित करार हा कायद्याच्या तरतुदीनुसार नसेल तर सक्षम प्राधिकरण शेतकऱ्याच्या विरोधात निकाल देऊ शकणार नाही. - कराराच्या अटीनुसार शेतकऱ्याला देय असलेल्या तारखेपासून सात दिवसांच्या आत व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा व्यवहार पूर्ण केला नाही तर तो त्यांचा छळ समजला जाईल व तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावण्यात येतील.  

टॅग्स :FarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना