शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

फडणवीसांच्या काळातील वृक्षलागवड कितपत यशस्वी?; ठाकरे सरकार करणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 11:06 IST

फडणवीस सरकारनं राबवलेल्या वृक्ष लागवड अभियानाची चौकशी होणार

ठळक मुद्दे५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा फडणवीस सरकारचा दावावृक्ष लागवड अभियानातून अपेक्षित काम न झाल्याची ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांना शंकावनमंत्री संजय राठोड यांच्याकडून वृक्ष लागवड अभियानाच्या चौकशीचे आदेश

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी वृक्ष लागवड अभियानात सहभाग घेतला होता. त्यावेळी एक रोपटं लावताना याचा पुढे वटवृक्ष होईल आणि आमची मैत्री या झाडाप्रमाणेच वाढत जाईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यत्त केली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारनं ५० कोटी वृक्ष लावण्याचा दावा केला होता. यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर दरवर्षी साधारणत: १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या अभियानातून अपेक्षित काम न झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारमधल्या काही मंत्र्यांनी उपस्थित केली होती. त्यांनी या संदर्भात लेखी पत्रदेखील दिलं. त्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिल्यानं विभागाचे प्रधान सचिव येत्या आठवड्यात नागपुरला जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत किती वृक्ष लावण्यात आले, त्यातले किती वृक्ष जगले, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती देशी होते, किती परदेशी होते, याची चौकशी प्रधान सचिवांकडून करण्यात येईल. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. सरकारनं वृक्ष लागवडीची चौकशी करावी. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीचा आढावा घ्यावा, असं त्यांनी म्हटलं. वृक्ष लागवड हे ईश्वरीय कार्य असून ते पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आम्ही या अभियानात अत्यंत गांभीर्यपूर्वक काम केल्याचं त्यांनी सांगितलं. वृक्ष लागवड अभियानात वन मंत्रालयासह एकूण ३२ विभाग कार्यरत होते. या अभियानातले ६० टक्के वृक्ष इतर विभागांनी लावले आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी नागपुरात एक उत्तम कमांड रूम उभारण्यात आली होती. सरकारच्या त्या अभियानाची लिम्का बुकनंदेखील नोंद घेतली होती, असं मुनगंटीवार म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार