शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

Uddhav Thackeray Bhaskar Jadhav: 'धनुष्यबाण' गोठवलं, उद्धव ठाकरे रडले रवि म्हात्रेंना अश्रू अनावर; भास्कर जाधवांच्या भाषणाने सभागृह गहिरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 00:13 IST

बाळासाहेब देवासोबत त्या धनुष्यबाणाचीही पूजा करायचे...!

Uddhav Thackeray Emotional, Bhaskar Jadhav: महाराष्ट्रात गेल्या ३-४ महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात शनिवारी एक महत्त्वाची घटना घडली. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोनही गटांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यासोबत शिवसेना हे नावदेखील वापरता येणार नसल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे गटासाठी हा धक्का होताच. पण स्थापनेपासून शिवसेना जवळून पाहणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला. पक्षाचे चिन्ह आणि नाव निवडणुकीसाठी वापरता येणार नसल्याचे समजताच उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल रवी म्हात्रे यांना अक्षरश: भावना अन् अश्रू अनावर झाल्याचा एक हळवा किस्सा भास्कर जाधवांनी आज साऱ्यांना सांगितला. हा किस्सा ऐकून संपूर्ण सभागृहदेखील सुन्न पडल्यासारखे झाल्याचे दिसून आले.

आजपासून शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यामधून झाली. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज भास्कर जाधव यांनी भाषण केले. भास्कर जाधव यांना विधानसभेत अतिशय आक्रमकपणे आपले मुद्दे मांडताना साऱ्यांनीच पाहिले आहे. पण आजच्या भाषणात त्यांनी आक्रमक आवाज असूनही शिवसैनिकांना भावनिक साद घातली आणि उद्धव ठाकरेंच्या बद्दलचा एक किस्सा सांगून सभागृहातील साऱ्यांनाच स्तब्ध करून टाकले.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना नेते उपनेत्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीअगोदर मातोश्रीवर घडलेला भावनिक प्रसंग भास्कर जाधवांनी सांगितला. "इतक्या वर्षात उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक संकटे आली पण ते कधी डगमगले नाही. आज त्यांच्यावर सगळ्या बाजूंनी हल्ले होत आहेत, काही कुटुंबीयदेखील विरोधात उभे आहेत, बंडखोर त्रास देत आहेत... पण तरीही ते सारं काही सहन करून सामोरे जात आहेत. असं असले तरी मला काही पत्रकारांनी सांगितलं की आज आम्ही उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं. पत्रकारांच्या नंतर आम्ही सारे नेतेमंडळी त्यांना भेटलो, त्यावेळीही मला त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले. ते दाखवत होते की मला काहीही झालं नाही, मी ठीक आहे, पण त्यांच्या डोळ्यातलं पाणी ते लपवू शकले नाहीत. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही कितीही लपवा पण तुमच्या डोळ्यातलं पाणी तुम्ही लपवू शकत नाही. त्यावेळी तिथे बाळासाहेब ठाकरेंसोबत आयुष्यभर काम केलेले रवी म्हात्रे होते. त्यांच्या अश्रूंचाही बांध फुटला. ते म्हणाले की, बाळासाहेब ज्यावेळी देवाची पूजा करायचे त्यावेळी ते देव्हाऱ्यात ठेवलेल्या धनुष्यबाणाचीही पूजा करत होते. ते धनुष्यबाण आज गोठवण्यात आलंय त्यामुळे मला अश्रू अनावर झालेत." भास्कर जाधवांनीही हा किस्सा सांगितल्यानंतर नाट्यगृहात काही काळ सारेच सुन्न झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधव