शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Uddhav Thackeray: “रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळा; गरजेपेक्षा जास्त दिल्यास दुष्परिणाम होण्याची शक्यता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 22:15 IST

CM Uddhav Thackeray on Remdesivir: रुग्णाला रेमडेसिवीर द्यायचं की नाही हे डॉक्टरांना ठरवू द्या असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील जनतेला दिला आहे.

ठळक मुद्देहवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रात बसविणे सुरु आहे. रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पाजवळ जम्बो केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे लिक्विड ऑक्सिजन ने आण करता येते. परंतु गॅस ऑक्सिजन वाहून नेता येत नाही

मुंबई – सध्या राज्यात ऑक्सिजनसहरेमडेसिवीर इंजेक्शनाबाबतही मोठ्या प्रमाणात मागणी होतेय. सगळ्यांना रेमडेसिवीर पाहिजे. आपल्याला सरासरी ५० हजार रेमडेसिवीरची आवश्यकता आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा केंद्राकडून होत आहे. २६, ७४८ रेमडेसिवीर केंद्राकडून मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली त्यानंतर ४३ हजार रेमडेसिवीर केंद्राकडून पाठवण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. परंतु रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर करू नका. गरजेपेक्षा जास्त रेमडेसिवीर दिल्यास त्याचे दुष्परिणाम नाकारता येत नाही. रुग्णाला रेमडेसिवीर द्यायचं की नाही हे डॉक्टरांना ठरवू द्या असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील जनतेला दिला आहे.

"१२ कोटी लसीचे डोस एकरकमी चेकने खरेदी करू, पण केंद्रानं लक्ष घालून लस पुरवठा करावा"

हवेतून ऑक्सिजन तयार करणे

हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रात बसविणे सुरु आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये हे प्लांट उभे राहतील. एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो. मुंबई महापालिका १२ रुग्‍णालयांमध्‍ये १६ ऑक्सिजन प्‍लांट उभारत आहे. या सर्व १६ प्रकल्‍पांतून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे. ३५ जिल्ह्यांतून ३०९ प्लांट्सपैकी  २१ कार्यरत आहेत त्यातून २७ मेट्रिक टन पुरवठा सुरु आहे. २८० प्लांट प्रस्तावित आहेत लवकरच ३५१ मेट्रिक टन पुरवठा सुरु होईल. १९००० बेड्सना ऑक्सिजन देणे शक्य आहे.

"मी कुठेही कधीही राजकारण आणणार नाही, पण..."; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

गॅस ऑक्सिजन जिथे तिथेच कोविड सेंटर

महाजेनकोच्या खापरखेडा, अकोला आणि परळी येथील केंद्रानजीक मोठ्या प्रमाणावर जम्बो सुविधा उभारण्यात येत असून त्याठिकाणी थेट रुग्णांना ऑक्सिजन मिळेल याची व्यवस्था करण्यात येत आहे. रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पाजवळ जम्बो केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. पेनमधील जेएसडब्ल्यू कंपनीच्या रुग्णालयात लवकरच जम्बो कोविड सेंटर सुरु होत आहे. लॉंयड स्टील, वर्धा परिसरात १००० बेड्सची जम्बो सुविधा उभारणार आहे. लिक्विड ऑक्सिजन ने आण करता येते. परंतु गॅस ऑक्सिजन वाहून नेता येत नाही. मग जिथे जिथे गॅस ऑक्सिजन आहेत त्याच्या शेजारी कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न आहे.

तिसरी लाट आली तरी महाराष्ट्र सक्षम

संपूर्ण जगात कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत आहेत. आणखी किती लाट येणार कल्पना नाही. दुसरी लाट आपण अनुभवतोय. तिसरी लाट येणार नाही असं कोणी सांगू शकत नाही. त्यासाठी महाराष्ट्राने तयारी केली आहे. तिसरी लाट आली तरी त्याचे गंभीर आणि घातक परिणाम होणार नाही यासाठी महाराष्ट्र कंबर कसून तयार आहे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसremdesivirरेमडेसिवीरcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन