Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन'; ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो, बाळासाहेबांना अभिवादन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 02:15 PM2022-01-23T14:15:34+5:302022-01-23T14:21:38+5:30

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

Uddhav Thackeray and Aaditya Thackeray Pays Homage To Balasaheb Thackeray and Netaji Subhas Chandra Bose on his birth anniversary | Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन'; ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो, बाळासाहेबांना अभिवादन!

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन'; ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो, बाळासाहेबांना अभिवादन!

googlenewsNext

मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी मानदुखीचा त्रास झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे गेले काही दिवस ते घरीच आराम करत होते. दरम्यान, या आजारपणातून बरे झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच उद्धव ठाकरे अशा पद्धतीने फोटोच्या माध्यमातून समोर आले आहेत. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते झोपून आहेत, कशाचा तरी आधार घेऊनच त्यांना चालावे लागते, अशा काही वावड्या राजकीय वर्तुळात उठवल्या जात होत्या. मात्र, अशा वावड्यांना उद्धव ठाकरेंच्या आजच्या फोटोमुळे पूर्णविराम मिळाला आहे. तसेच, उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन' असल्याचे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत साधणार संवाद!
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज संवाद साधणार आहेत. हा संवाद ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल, अशी माहिती आहे. मात्र आता बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देणार आणि काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Uddhav Thackeray and Aaditya Thackeray Pays Homage To Balasaheb Thackeray and Netaji Subhas Chandra Bose on his birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.