Maharashtra Politics: छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:34 IST2023-01-18T14:33:31+5:302023-01-18T14:34:56+5:30
Maharashtra News: आता प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या दृष्टीकोनाने बोलतात, अशी टीका उदयनराजे यांनी केली.

Maharashtra Politics: छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले...
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली होती. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आमने-सामने आले होते. यानंतर या वादाचे वादळ शांत होतेय, तोच उदयनराजे भोसले यांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर, यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, सर्वधर्मसमभाव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. कुठल्या जातीधर्मातील लोकांशी त्यांनी भेदभाव केला नाही. आता प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या दृष्टीकोनाने बोलतात. पण छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनीही कधी कुठल्या धर्माचा अनादर केला नाही, त्यामुळे यावरून कुठलाही वाद निर्माण करू नये, असे आवाहन उदयनराजे यांनी यावेळी केले.
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर?
पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले की, त्यावेळी त्यांनी मंदिरांसोबत मशिदीही बांधल्या. साताऱ्यात शाही मशिदीची देखरेख आजही आमच्या कुटुंबाकडून होते. छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे दोघंही स्वराज्यरक्षक होते. त्यांनी सगळ्या धर्मांचा आदर केला म्हणून धर्मरक्षकही होते, असे उदयनराजे यांनी सांगितले.
दरम्यान, संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी विधिमंडळात बोलताना केले होते. यानंतर भाजप नेत्यांनी, संभाजी महाराज हे धर्मवीरच होते, त्यांनी धर्मासाठीच बलिदान दिले, असे सांगत अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"