सातारा, दि. 2 - 'खंडणी'प्रकरणी एक दिवसाआड पोलिस ठाण्यात लावण्यात येणारी खासदार उदयनराजेंची हजेरी अखेर न्यायालयाने रद्द केली असून, त्यांचा तात्पुरता जामीनही कायम केला आहे. यावेळी, न्यायालयासह अनेक प्रमुख चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एका उद्योजकाकडे खंडणी मागितली अन त्याच्या हत्येचा प्रयत्न केला, या गुन्ह्याखाली उदयनराजेंसह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर उदयनराजे तब्बल तीन महिन्यांनी स्वतः हून सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले होते. तेव्हा, न्यायालयानं एक दिवसाआड हजेरी लावण्याच्या अटीवर दोन ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला होता. 'पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून आता उदयनराजेंच्या हजेरीची गरज नाही,' असा युक्तिवाद राजेंच्या वकिलांनी केला. सरकारी वकिलांनीही जवळपास तशीच भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्यांची हजेरी रद्द केली तर कायम स्वरूपी जामीनही मंजूर केला.
उदयनराजेंची हजेरी रद्द; कायमस्वरुपी जामीनही मिळाला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 18:26 IST