शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

...तर उदयनराजेंनी स्वाभिमान पक्षात यावे! नितेश राणेंचे आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 4:49 PM

उदयनराजे भोसले एक ताकदवर नेते आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचेही स्वागत आहे. असे ट्विट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी करुन एकप्रकारे खासदार उदयनराजे भोसलेना स्वाभिमान पक्षात यायचे आवतन दिले आहे.

ठळक मुद्देउदयनराजेना स्वाभिमान पक्षात येण्याचे नितेश राणेंचे आवतनमी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात : आमदार नितेश राणेंचे ट्विट

कणकवली : उदयनराजे भोसले एक ताकदवर नेते आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचेही स्वागत आहे. असे ट्विट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी करुन एकप्रकारे खासदार उदयनराजे भोसलेना स्वाभिमान पक्षात यायचे आवतन दिले आहे.

सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरुन मुंबईत रविवारी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत घमासान झाले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांच्या समर्थकांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध केला. बैठकीत रामराजे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी झाली. या बैठकीला खासदार उदयनराजे उशिरा पोहोचले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे यांच्याशी १५ मिनिटे कमराबंद चर्चा केली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. शरद पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. उमेदवारी मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. गेल्या वेळेला मला मिळालेले मताधिक्य पक्षाने लक्षात घेतले पाहिजे. माझे लीड तोडणारा कोण असेल तर माझी माघार असेल. त्याचवेळी अनेक पक्षात माझे आमदार व खासदार मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.या पार्श्वभूमिवर उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्याचा धागा पकडत आमदार नितेश राणे यांनी मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचेही स्वागत आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान , आमदार नीतेश राणे यांच्या या ट्वीट नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबाबत उलट सुलट चर्चा रंगली आहे. यापूर्वी स्वाभिमान पक्षाध्यक्ष नारायण राणे यांनी पक्षातर्फे आगामी निवडणुका पूर्ण ताकदिने लढविणार असल्याचे जाहिर केले होते.

कार्यकर्त्याना कामाला लागण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याच्या दृष्टिने चाचपणी सूरू केली आहे. त्यामुळे यापार्श्वभूमिवर आमदार नीतेश राणे यांचे हे टिवट महत्वपूर्ण मानले जात आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग