शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

उदयनराजेंसह ८० जणांवर दरोड्याचा गुन्हा!

By admin | Published: February 23, 2017 4:22 AM

जावळी तालुक्यातील खर्शी बारामुरे येथे झालेल्या राजकीय धुमश्चक्रीप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला

 सातारा/मेढा : जावळी तालुक्यातील खर्शी बारामुरे येथे झालेल्या राजकीय धुमश्चक्रीप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून खा. उदयनराजे भोसले आणि वसंत मानकुमरे यांच्यासह ८० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.पोलिसांनी मानकुमरे व त्यांच्या चिरंजीवाला पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक केली.मेढा येथील मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. चारशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा जावळी तालुक्यात तैनात करण्यात आला होता. खा. उदयनराजे यांचे समर्थक अजिंक्य मोहितेने पत्नीच्या गळ््यातील ८ तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावल्याची तक्रार वसंत मानकुमरे यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी उदयनराजेंसह अजिंक्य मोहिते, गणेश जाधव, किशोर शिंदे आदी ४० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. वसंत मानकुमरेंसह ३५ ते ४० जणांनी हल्ला करून गाडीची तोडफोड तसेच गळ्यातील चेन आणि २० हजारांची रोकड हिसकावून नेली. तर स्वप्नीलने गळ्याला गुप्ती लावली. जयश्री मानकुमरे यांनी थोबाडीत मारली, अशी तक्रार अजिंक्य मोहितेने दिली. पोलिसांनी स्वप्नील, जयश्री व वसंत मानकुमरे यांच्यासह ४० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)पिता-पुत्राविरोधात पोलिसांकडूनच गुन्हाखर्शी बारामुरे येथील मतदान केंद्रावर पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न तसेच पोलिसांच्या गाडीची तोडफोड केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत मानकुमरे तसेच त्यांचा मुलगा स्वप्नील याच्यासह अन्य एकाला पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली.खर्शी बारामुरे येथील मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर मानकुमरे समर्थकांनी दगडफेक केली होती. त्यामध्ये पोलिसांच्या गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तसेच दोन पोलीस जखमी झाले होते.