नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, शिवसेना स्थानिकांसोबत: उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 05:14 PM2021-03-07T17:14:49+5:302021-03-07T17:17:02+5:30

रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पावरून (Nanar Refinery Project) पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प हातातून गमावू नये, असे म्हटले आहे.

uday samant react on nanar refinery project issue | नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, शिवसेना स्थानिकांसोबत: उदय सामंत

नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, शिवसेना स्थानिकांसोबत: उदय सामंत

googlenewsNext
ठळक मुद्देनाणार प्रकल्पावर उदय सामंत यांची प्रतिक्रियामी त्याबद्दल काही बोलणार नाही - उदय सामंतदेशातील एक मोठे इनोव्हेशन पार्क कोकणात - उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पावरून (Nanar Refinery Project) पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प हातातून गमावू नये, असे म्हटले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना स्थानिक जनतेसोबत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. (uday samant react on nanar refinery project issue)

राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्या भूमिकेतून राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नाणार प्रकल्प नको, अशीच स्थानिकांची भूमिका आहे. शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. नाणार प्रकल्पाची गोष्ट शिवसेनेसाठी संपली आहे, असे उदय सामंत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अशक्य, जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी"

मी त्याबद्दल काही बोलणार नाही

मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी तेथील ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे, त्याबद्दल काही बोलणार नाही. त्यान्नी त्यांची भूमिका मांडलेली आहे, असे सांगत रिफायनरी समर्थकांनी माझी भेट घेतली. जागेचा उपयोग तेथील लोकांना रोजगार निर्मितीसाठी झाला पाहिजे, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले. 

देशातील एक मोठे इनोव्हेशन पार्क कोकणात

देशातील एक मोठे इनोव्हेशन पार्क कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. रायगड जिल्हा केमिकल झोन असल्यामुळे तेथे केमिकल कंपन्या येतील. रत्नागिरी जिल्ह्यात सरकारकडून काही प्रकल्प राबविले जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनावर आधारित प्रकल्प येतील. या माध्यमातून कोकणातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होतील. मात्र नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. 

राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद; केवळ 'या' ठिकाणी देता येईल दान

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. 

Web Title: uday samant react on nanar refinery project issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.