शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 07:38 IST

samruddhi mahamarg Accident News: शहापूर तालुक्यातील वासिंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर जीप आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककसारा : शहापूर तालुक्यातील वासिंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर जीप आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. सातजण जखमी झाले. ही दुर्घटना वासिंद आणि आमणे दरम्यान गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. अब्दुल पाशा शेख (वय ६५) आणि जाहीद सिद्दिकी (४०) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुले, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यामधील दोन ते तीनजणांना जास्त मार लागल्याचे भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयातून सांगण्यात आले. 

समृद्धी महामार्गावरून एक कंटेनर मुंबईकडे जात होता. यादरम्यान नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून भिवंडीकडे भरधाव वेगात निघालेल्या जीपचालक मारुती गुंजाळ याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व जीप पुढे चाललेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह सहा जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गवरील रुग्णवाहिका, महामार्ग पोलिस शहापूरच्या प्रभारी अधिकारी छाया कांबळे यांनी कर्मचारी पाठवून अपघातग्रस्त  जखमींना भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींना अधिक उपचारासाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात हलविले आहे. 

डुलकी लागल्याने अपघात पहाटेच्या सुमारास पाऊस कोसळत होता. अतिवेगात असलेल्या जीपचालक मारुती गुंजाळ याला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.   

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग